ETV Bharat / state

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचा तिरडी मोर्चा

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी शुक्रवारी सिडकोच्या कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अनोखा तिरडी मोर्चा काढला.

author img

By

Published : Nov 16, 2019, 2:37 AM IST

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबधितांचा तिरडी मोर्चा

नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी शुक्रवारी सिडकोच्या कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अनोखा तिरडी मोर्चा काढला. यावेळी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तिरडी बनवून सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला. या तिरडी मोर्चात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचा तिरडी मोर्चा

१६० हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावीत नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली. रस्ते व इतर गोष्टी वगळता फक्त 16 टक्के प्लॉटची जागा विमानातळ बधितांना मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी कोबंडभुजे, तरघर, वाघिवली, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा, गणेशपुरी या दहा गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सिडकोने आम्हाला निव्वळ आश्वासन दिली. आम्हाला आमच्या जागेतून हलवले, अश्या प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त व्यक्त करीत आहेत. विमानतळाच्या भरावामुळे पावसाळ्यात डुंगी पारगाव व इतर विस्थापित न झालेली गावे पाण्याखाली जात आहेत. अखिल भारतीय किसान सभा, नांदाईमाता चार गाव संघर्ष समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना यांच्या माध्यमातून हा तिरडी मोर्चा काढण्यात आला होता.

काय आहेत विमानतळ बाधितांच्या मागण्या..

  • प्रकल्पग्रस्तांच्या घरावर चालविलेल्या तोडकामास विरोध.
  • मच्छीमारांच्या लढ्यातून मान्य झालेल्या मच्छीमारांच्या पुनर्वसनाची तातडीने अंमलबजावणी करणे.
  • बांधकाम खर्च १००० वरून २५०० करणे.
  • प्रकल्पग्रस्तांना विमानतळ प्रकल्पात कायमस्वरूपी नोकऱ्या देणे.
  • विमानतळ भरवामुळे डुंगी पारगाव, भंगारपाडा व ज्या गावात पाणी शिरते त्या गावांचे पुनर्वसन पॅकेज लागू करणे आणि मच्छीमारांना नुकसान भरपाई देणे.
  • १२.५% चे प्रलंबित प्रश्न सिडकोने तातडीने सोडवावे.
  • शुन्य पात्रता पद्धत बंद करून प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक बांधकामांस तिप्पट क्षेत्र नुकसान भरपाईचा लाभ देण्यात यावा.

Intro:
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबधितांचा तिरडी मोर्चा....

नवी मुंबई:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांनी आज सिडकोच्या कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अनोखा तिरडी मोर्चा काढला. यावेळी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तिरडी बनवून सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला . या तिरडी मोर्चात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
सिडकोने चालविलेला मनमानी कारभार व हुकूमशाही विरुध्द एकत्र येण्याचे आवाहन विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांना केलं होतं. विमानतळ बाधीत नागरिकांची स्थिती अत्यंत बिकट होतं चालली आहे, सिडकोने दिलेल्या पैशात घर चालवायचे,भाड भरायचं की घरं बांधायचं, असे एक ना अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत, विमानतळ होईल तेव्हा त्यांना व त्यांच्या पिढीला रोजगार मिळावा अशी माफक अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत..नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे, १६० हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या कामाला पाहता पाहता सुरुवात झाली. विमानतळ बाधीत गावांना शेतजमीवर सिडकोने साडे २२% योजना सुरू करण्यात आली आहे, त्यातही रस्ते व इतर गोष्टी वगळता फक्त पावणे सोळा टक्के प्लॉटची जागा विमानातळ बधितांना मिळाली आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी कोबंडभुजे, तरघर, वाघिवली, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा, गणेशपुरी या दहा गावांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. प्रकल्पग्रस्त इथल्या निसर्गसंपन्नतेल कायमचा मुकला गेला आहे. वाघिवलीच्या चोहूबाजूंनी खाडी असलेल्या गावांत प्रत्येकाच्या घरी लहानमोठी बोट होती. अनेकांची उपजीविका या खाडीतील मच्छिमारीवर चालत असे. घरभाडे, इतर खर्च यातून सिडकोच्या माध्यमातून मिळालेले काहींचे पैसे संपले आहेत, त्यामुळे कॉलनीतून परतून जवळपास असणाऱ्या दिघोडे विंधणे व इतर आजूबाजूच्या गावात भाड्याने राहण्याकडे कल आहे सिडकोने आम्हाला निव्वळ आश्वासन दिली, आम्हाला आमच्या जागेतून हलवलं आम्ही मात्र आमच्या भूमीतून विस्थापित झालो आहोत अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त व्यक्त करीत आहेत.
विमानतळाच्या भरावामुळे पावसाळ्यात डुंगी पारगाव व इतर विस्थापित न झालेली गावे पाण्याखाली जात आहेत कित्येक दिवस सिडकोच्या माध्यमातून विमानतळ बधितांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने आज चक्क विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी सिडकोवर रोष व्यक्त करण्यासाठी तिरडी मोर्चा काढून सिडकोच्या नावाने बोंबा मारल्या.
अखिल भारतीय किसान सभा, नांदाईमाता चार गाव संघर्ष समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना यांच्या माध्यमातून हा तिरडी मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.

काय आहेत विमानतळ बधितांच्या मागण्या..

*प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर चालविलेल्या तोडकामास विरोध
मच्छीमारांच्या लढ्यातून मान्य झालेल्या मच्छीमारांच्या पुनर्वसन पॅकेजची तातडीने अंमलबजावणी करणे
*बांधकाम खर्च १००० वरून वाढीव बांधकाम खर्च २५०० करणे
* प्रकल्पग्रस्तांना विमानतळ प्रकल्पात कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणे
* विमानतळ भरवामुळे डुंगी पारगाव, भंगारपाडा व ज्या गावात पाणी शिरते त्या गावांचे पुनर्वसन पॅकेज लागू करणे
*विमानतळ भरावा मुळे उलवे, ते पनवेल कोळीवाडयापर्यत बाधीत होणाऱ्या सर्व मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी.
*१२.५% चे प्रलंबित प्रश्न सिडकोने तातडीने सोडवावे
*शुन्य पात्रता पद्धत बंद करून प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक बांधकामांस तिप्पट क्षेत्र नुकसान भरपाईचा लाभं देण्यात यावा.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.