मुंबई : Nashik Drug Case : साकीनाका पोलिसांनी नाशिक येथील एमडी ड्रगचा (MD Drugs) कारखाना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उध्वस्त केला. त्यानंतर ड्रगच्या कारखान्याचा मालक असलेल्या ललित पाटीलच्या मुसक्या 17 ऑक्टोबरला कर्नाटक हायवे जवळ असलेल्या चन्नासंद्री या हॉटेलमधून आवडल्या होत्या. ड्रग्ज माफिया असलेल्या ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) या आरोपीने सचिन वाघ या आरोपीला बारा किलो ड्रग्ज नष्ट करण्याच्या सूचना दिली होत्या. ते बारा किलो एमडी ड्रग्सची किंमत 30 कोटी इतकी आहे. हे एमडी ड्रग्स नाशिकहून आज सकाळी साकीनाका पोलिसांनी जप्त (Sakinaka Police Station) केले आहे.
27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी : 17 तारखेला रात्री नऊ वाजताच्या सुमारास कर्नाटक हायवेवरील चन्नासंद्री हॉटेलमधून साकीनाका पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. त्याआधी 15 ऑक्टोबरला ललित पाटीलचे साथीदार रोहित चौधरी आणि शिवाजी शिंदे या दोन आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक (Sakinaka Police) केली होती. या तिघांनाही काल अंधेरी कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. साकीनाका पोलिसांनी कोर्टात बंदोबस्तामुळे या तीनही आरोपींची कसून चौकशी करता आली नाही. त्यामुळे आणखी पोलीस कोठडी वाढून द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार अंधेरी कोर्टातर्फे या तिघांनाही 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली.
कच्चा माल पुरवत असल्याचं निष्पन्न : साकीनाका पोलिसांनी केलेल्या चौकशी ललित पाटील त्याच्या नाशिक येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यात टेक्निशियन म्हणून दिल्लीत राहणारा रोहित चौधरी हा काम करत होता. तर नाशिक मध्येच राहणारा शिवाजी शिंदे हा एमडी ड्रग्स बनवण्यासाठी कच्चा माल पुरवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे एमआयडीसी येथील ही कारखान्याची जागा यादव यांच्या मालकीची असून कांबळे नावाच्या व्यक्तीवर भाडे करार बनवण्यात आला होता.
भूषण पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात : गेल्या सहा महिन्यांपासून भाडेतत्त्वावर घेतलेल्या या कारखान्याचे भाडे भूषण पाटील याच्या बँक खात्यातून देण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भूषण पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे ललित पाटील याच्याकडे हवालामार्फत लाखो रुपये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे ललित पाटील प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या सचिन वाघ या आरोपीला देखील शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- MLA Dhangekar On Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो- आमदार रवींद्र धंगेकर
- Nashik Drug Case : मोठी बातमी! नाशिकमधील गिरणा नदीत सापडलं 100 कोटींचं ड्रग्ज, पोलिसांकडून अंडरवॉटर शोधमोहीम
- Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरण: आरोपी अरविंद लोहारेला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी