ETV Bharat / state

Naresh Goyal Case : जेटच्या नरेश गोयल यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, जामिनासाठी याचिका दाखल - PMLA court

Naresh Goyal Case : न्यायालयीन कोठडीनंतर नरेश गोयल यांनी संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुवनावली होती.

Naresh Goyal Case
Naresh Goyal Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 8:05 PM IST

मुंबई Naresh Goyal Case : कॅनरा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नरेश गोयल यांना मुंबई सत्र न्यायालयाने (PMLA court) नुकतीच 14 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे. मात्र नरेश गोयल यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai HC) संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. पुढील काही दिवसात त्यावर सुनावणी होणार आहे.

कॅनरा बँकेकडून बेकायदेशीरपणे कर्ज उचलणे आणि बँकेच्या पैशांची अफरातफर करणे असा आरोप अंमलबजावणी संचलनालयानं नरेश गोयल यांच्यावर ठेवलेला आहे. या संदर्भातल्या फॉरेन्सिक ऑडिटमधून ही बाब स्पष्ट झाल्याचं ईडीने आपल्या आरोपात म्हटलं आहे. यासंदर्भात नरेश गोयल यांना ऑगस्टच्या अखेरीस समन्स जारी केलं गेलं होतं. ते हजर झाले नाहीत म्हणून ईडीने त्यांना अटक केली आणि पीएमएलए न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु 'अटक बेकायदेशीर' असल्याचा दावा करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.

हेही वाचा - ED arrests Jet Airways founder Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक; ईडीची कारवाई

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक चेअरमन नरेश गोयल यांना 538 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक केलेली आहे. त्या संदर्भातला तपास सुरू आहे. ते तपासामध्ये सहकार्य करत नाहीत असा ईडीचा दावा होता. म्हणूनच त्यांना ईडीची कोठडी सुनावली होती. परंतु 14 सप्टेंबर रोजी याबाबत सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु आपली अटक ही बेकायदेशीर असल्याचा त्यांनी दावा केला आहे. उच्च न्यायालयात आता संरक्षण मिळण्यासाठी धाव घेतली आहे. येत्या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे.

न्यायालयामध्ये तीनवेळा हजर - नरेश गोयल यांना न्यायालयामध्ये तीनवेळा हजर केलं आहे. त्यांच्या वकिलांनी त्यांचं वाढतं वय पाहता आणि त्यांना विविध आजार असल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य देखील केलेली आहे. त्यांच्या पत्नीला कर्करोग आहे. त्यामुळे पत्नीच्या पण आजारपणाबाबत ख्यालीखुशाली विचारण्यासाठी दररोज 15 मिनिटाची संवाद करण्यासाठी वेळ मिळेल. हे देखील सत्र न्यायालयाने मान्य केले आहे. या भेटीच्या वेळेला ईडी अधिकारी उपस्थित असतील. तळोजा तुरुंगाऐवजी मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात त्यांना सध्या कोठडीत ठेवलं आहे.

हेही वाचा - Naresh Goyal News : नरेश गोयल यांना 28 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तळोजातून ऑर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.