मुंबई - नरेंद्र मोदी आज गुरुवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीचे थेट प्रक्षेपण मुंबकरांनाही पाहता यावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्याकडून सायन सर्कल येथे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि एनडीएच्या मित्र पक्षांनी घवघवीत यश संपादन करत एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर दिल्ली येथे एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाने शिक्कामार्तब झाले. आज नरेंद्र मोदी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीचे थेट प्रक्षेपण सायन सर्कल येथे केले जाणार आहे.
या प्रक्षेपणाचा आनंद नागरिकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून, या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे, या शपथविधीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय हजर राहणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधीसाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.