मुंबई - नाणार प्रकल्प समर्थकांनी आज (दि. 8 मार्च) राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी नाणार वासियांनी 8 हजार जणांच्या संमती पत्राची एक बॅग भरुन आणली होती. तसेच नाणार प्रकल्प कसा कोकणाच्या हिताचा आहे हे सांगितले.
नाणार स्थानिक पातळीवर होणारा विरोध हा 80 ते 90 टक्के मावळला आहे. यापूर्वी येथे काही सामाजिक संस्थांनी विरोध करत लोकांची दिशाभूल केली होती. अनिल काकोडकर तसेच रघुनाथ माशेलकर यांनी हा प्रकल्प कसा हिताचा हे जणतेला समजावून सांगितले आहे. त्यामुळे समर्थनाची भूमिका वाढली आहे. नाणारमुळे रोजगार वाढेल, असेही अॅड. शशिकांत सुतार यांनी सांगितले.
कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल, ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी (दि. 7) पाठवले होते. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१-२२ : पर्यावरण आणि पर्यटनासाठी मोठी तरतूद
हेही वाचा - नाणार प्रकल्प : राज ठाकरेंनी मत का बदललं माहित नाही पण.., राऊत यांनी राज यांना केलं 'हे' आवाहन