ETV Bharat / state

Maharashtra Politics: राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकऱ्यांसाठी ठेंगा- नाना पटोले; नामांतरापेक्षा जिल्ह्यांच्या विकासाकडे लक्ष द्या- सत्यजीत तांबे - Nana Patole news

नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी अभिभाषणात शेतकऱ्यांसाठी ठेंगा असल्याचे म्हटले आहे. तर सत्यजीत तांबेंनी नामांतरणावर प्रतिक्रिया देताना नामांतरापेक्षा जिल्ह्यांच्या विकासाकडे लक्ष द्या, असे म्हटले आहे.

Maharashtra Politics
नाना पटोले व सत्यजीत तांबे
author img

By

Published : Feb 27, 2023, 1:05 PM IST

प्रतिक्रिया देताना नाना पटोले व सत्यजीत तांबे

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीकासत्र सोडले आहे. या प्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकऱ्याला काही धीर दिला जाईल, असे वाटले होते. कांदा कापूस, धान, तुर, सोयाबीन हे शेतकरी बरबाद झाले आहेत. या सरकारला आता विधानसभेत जाब विचारू. कांदा उत्पादकांचा कांदा आता सरकारने घ्यायला हवा. व्यापारी उद्योगपतींचे हे सरकार आहे का? या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. शेतकरी विरोधी हे सरकार आहे. ९ महिन्यात अनेक आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांना वीज दिली जात नाही.

काँग्रेसमध्ये सर्व आलबेल : महाराष्ट्रात काहीही धुसफूस नव्हती. पुण्यामध्ये दोन्ही जागा आमच्या निवडून येतील. मनीष सिसोदिया यांना ज्याप्रकारे अटक करण्यात आली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकुमशाही पवृती, अघोषित आणीबाणी सुरू झालेली आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. नावे बदलून भावनेच्या आधारावर भाजप राजकारण करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी लगावला आहे.

नामांतरापेक्षा जिल्ह्यांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे : नाशिक पदवीधर मतदार संघातून विजयी झालेले अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे आज विधिमंडळात हजर झाले. याप्रसंगी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, मला विधिमंडळात काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्याचा योग्य तो सकारात्मक उपयोग मी करणार आहे. तसेच जनतेचे प्रश्न मी मांडणार आहे. नाशिक विभागातले विविध प्रश्न मांडण्याचा मी सकारात्मक प्रयत्न करणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे प्रश्न मी मांडणार आहे. नामांतराच्या प्रश्नावर बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, नामांतरामुळे विकास होणार असेल तर ठीक आहे. पण शासनाने नामांतरापेक्षा जिल्ह्यांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे.

सत्यजित तांबे : सत्यजित तांबे हे काँग्रेसचे माजी नेते आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र आहे. नाशिक विभागाच्या पदवीधर जागेसाठी काँग्रेसने यापूर्वी सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. महाविकास आघाडीच्या समर्थक उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29 हजार 465 मतांनी पराभव केला होता. शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली होती. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.

हेही वाचा : Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अतिरिक्त खाते इतर मंत्र्यांकडे वळवण्यात आली; 'या' मंत्र्यांकडे अतिरिक्त भार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.