ETV Bharat / state

अ‌ॅक्सिस बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नाना पटोले - Nana Patole बातमी

मुख्यमंत्र्यांची पत्नी ज्या अ‌ॅक्सिस बँकेत नोकरीला होत्या. त्या अ‌ॅक्सिस बँकेत गैरव्यवहार झाले. याची चौकशी व्हावी, म्हणून आम्ही न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे न्यायालयाच्या लक्षात आल्याने सुमोटो देत न्यायालयाने जनहित याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज मुंबईत केली.

नाना पटोले
author img

By

Published : Sep 23, 2019, 6:07 PM IST

Updated : Sep 23, 2019, 7:11 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ज्या अ‌ॅक्सिस बँकेत नोकरीला होत्या. त्या अ‌ॅक्सिस बँकेत 2017 मध्ये पोलिसांचे आर्थिक व्यवहार झाले. त्यामध्ये गैरव्यवहार झाले आहेत. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, म्हणून आम्ही न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे न्यायालयाच्या लक्षात आल्याने सुमोटो देत न्यायालयाने जनहित याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज मुंबईत केली.

नाना पटोले, ज्येष्ट नेते काँग्रेस

हेही वाचा - 'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'

मुख्यमंत्री फडणवीस हे एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, अ‌ॅक्सिस बँकेसाठी 2005 मध्ये जीआर काढला. परंतु, त्यात इतरही बँका होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बँकेच्या उपाध्यक्षा कशा झाल्या? यात नेमके काय व्यवहार झाले? यासाठी आम्ही न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सुमोटो देत जनहित याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, आणि याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

मुख्यमंत्री हे स्वतःला क्लीन मुख्यमंत्री म्हणतात. मग यात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी, असेही पटोले म्हणाले. मुख्यमंत्री, बेरोजगार आणि महिलांवरील अत्याचार हे विषय मुद्दाम काढत नाहीत. त्यांना जनतेची चिंता नाही, यामुळे त्यांनी राज्यात निवडणुकीसाठी 370 चा आधार घेतला आहे.

हेही वाचा - इतिहास 'मनसे' च्या बाजूने! शिवसेनाही कधी काळी होती अडचणीत

नुकतेच भाजपकडून करण्यात आलेल्या 'राष्ट्रवाद' या विषयावर बोलण्यात आल्यानंतर त्यावर पटोले म्हणाले की, राष्ट्रवाद हा आमचा धर्म आहे. नकली राष्ट्रवाद हा आमचा नाही, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्याचे काय केले? पंतप्रधान इकडे येऊन जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत, असेही पटोले यांनी सांगितले.

राज्यात आघाडीच्या 100 जागा येणार -

आम्ही 75 टक्के नवीन तरुण चेहरे देणार आहोत. सेना भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षात भूकंप होईल. त्यानंतर अनेक लोक आमच्याकडे येतील, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.

Intro:बातमी मोजोवर पाठवली आहे

Body:मोजोवर बातमी पाठवली आहे

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.