मुंबई: मालेगाव बॉम्ब ब्लास्ट खटला हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये अनेक आरोपी आहेत. या आरोपींपैकी एक आरोपी समीर कुलकर्णी याने त्याला त्या खटल्यातून वगळावे, असे याचिकेत म्हटले होते. त्याने याकरिता असे कारण दिलेले आहे की, एका साक्षीदाराच्या साक्षीमुळे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. या आधारावर असा आरोप ठेवणे पुरेसे नाही; मात्र एनआयएच्या विशेष न्यायालयाने त्याचीही मागणी अमान्य करत हे प्रकरण निकालात काढले.
न्यायालयाचे मत: एनआयएच्या विशेष न्यायालयाने समीर कुलकर्णीच्या या अर्जावर सुनावणी करताना अधोरेखित केले की, एक तर या आरोपीकडून न्यायानुसार उचित प्रक्रियेचे पालन न करता हा अर्ज दाखल केला गेला आहे. तसेच यामध्ये इतर अनेक आरोपी आहेत, अनेक साक्षीदार आहेत की ज्यांची साक्ष घ्यायची आहे. अजून काही तपास होणे बाकी आहे. त्याच्यामुळे समग्र आरोपींच्या संदर्भात या खटल्याचा विचार होतो एखाद्या घटनेचा नाही. आरोपीला कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठली विनंती करायची असेल तर त्याला ते स्वातंत्र्य नक्कीच आहे की तो अर्ज किंवा तक्रार विशेष न्यायालयामध्ये दाखल करू शकतो.
सामान्यांपासून तर दिग्गजांपर्यंत: समीर कुलकर्णी याला युएपीए कायद्यामध्ये आरोपी करण्यात आले आहे. 2017 या कालावधीमध्ये त्याला जामीन मंजूर झालेला आहे. न्यायालयाने असे देखील नमूद केले की, याबाबत कोणताही वाद असेल तर त्याबद्दल तक्रार दाखल करायला केव्हाही आरोपीला स्वातंत्र्य आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित तसेच साध्वी प्रज्ञा सिंग अश्या अनेक व्यक्तींवर आरोप आहेत. या खटल्यात आता पर्यंत 109 साक्षीदारांना एनआए विशेष न्यायालयात हजर केले गेले आहे. यामध्ये मुख्यतः सामान्य माणसे काही डॉक्टर्स देखील आहेत.
सुनावणीला टाळाटाळ होतेय: मालेगाव येथे झालेल्या 2008 बॉम्बस्फोटाचा निकाल अद्यापही लागलेला नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आदेश देऊनही खटल्याची सुनावणी रखडलेली आहे. या खटल्याची सुनावणी जलद आणि निष्पक्षपणे करावी, अशी मागणी समीर शरद कुळकर्णी यांनी केली होती.
कलंक पुसला जावा: समीर कुळकर्णी हे या साऱ्या प्रकरणात संशयित आरोपी असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. या सुनावणीसाठी ते आजही हजर राहतात. १५ वर्षात एकदाही मी न्यायालयाची तारीख चुकवली नाही. कारण मला माझ्यावर लगलेला कलंक पुसायचा आहे, असे मत समीर कुलकर्णी यांनी मांडले आहे.