ETV Bharat / state

माझ्या मुलीचा वापर माझ्या विरोधात केला जात आहे; विद्या चव्हाणांच्या सूनेचा आरोप

author img

By

Published : Mar 4, 2020, 8:50 PM IST

मला ५ वर्षांची मुलगी असताना मी ७ महिन्याची गरोदर होती. मात्र, माझा गर्भपात झाला होता. या नंतर मी पुन्हा गर्भवती झाल्यास माझ्या जिवावर बेतू शकते, असे मला डॉक्टरांनी सांगितल्यावर विद्या चव्हाण, त्यांचे पती, दीर व पतीकडून माझा अमानुष छळ सुरू करण्यात आला होता, असे डॉ. गौरी यांनी सांगितले.

dr. gauri on vidya chavhan
माहिती देताना डॉ. गौरी

मुंबई - राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात विद्या चव्हाण यांची सून डॉ. गौरी चव्हाण यांनी आपले मौन सोडले आहे. विद्या चव्हाण यांनी केलेल्या सर्व आरोपांचे डॉ. गौरी यांनी खंडन केले आहे.

माहिती देताना डॉ. गौरी

११ जानेवारी अगोदरच मला विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी बळजबरीने घराबाहेर काढले होते. माझ्या ५ वर्षांच्या मुलीला त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतल्याने ११ जानेवारी रोजी मी व माझे वडील मुलीला भेटण्यासाठी विले-पार्ले येथील निवासस्थानी गेलो होतो. मात्र, येथे मला व माझ्या वडिलांना अर्वाच्य शिवीगाळ करीत जबर मारहाण करण्यात आली, असा आरोप डॉ. गौरी चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात मी विले-पार्ले पोलीस ठाण्यात विद्या चव्हाण व कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून माझ्या मुलीला मला भेटू दिले जात नाही. या उलट विद्या चव्हाण माझ्या मुलीचा वापर माझ्या विरोधात करीत असून मी दाखल केलेला विनयभंग व अमानुष छळाचा गुन्हा मागे घ्यावा म्हणून माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप डॉ. गौरी यांनी केला आहे.

मला ५ वर्षांची मुलगी असताना मी ७ महिन्याची गरोदर होती. मात्र, माझा गर्भपात झाला होता. या नंतर मी पुन्हा गर्भवती झाल्यास माझ्या जीवावर बेतू शकते, असे मला डॉक्टरांनी सांगितल्यावर विद्या चव्हाण, त्यांचे पती, दीर व पतीकडून माझा अमानुष छळ सुरू करण्यात आला होता. माझे विवाहबाह्य संबंध आहेत, मला पैशांची हाव असल्याने मी गुन्हा दाखल केला, असा आरोप आमदार विद्या चव्हाण माझ्यावर करीत आहेत. मात्र, या आरोपात कुठलेही तथ्य नाही. माझ्या विरोधात खोटे पुरावे गोळा करण्याचे काम केले जात असल्याचे डॉ. गौरी चव्हाण यांनी म्हटले. मला केवळ आणि केवळ माझ्या मुलीचा ताबा मिळावा म्हणून मी लढा देत असल्याचेही डॉ. गौरी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- नीरव मोदीला उच्च न्यायालयाचा दणका, मुलाची याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.