ETV Bharat / state

Muslim Boy Accept Hinduism For Girlfriend : हिंदू मुलीशी प्रेम जमलं, मुस्लिमाचा हिंदूही झाला; मात्र मुलीच्या बापाने... नवऱ्या मुलाचा आरोप - पत्नीचे अपहरण प्रकरण

हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर एका मुस्लिम मुलाने हिंदू धर्म स्विकारला; त्यानंतर विवाहिता नवऱ्याकडे नांदायला आली; परंतु तिच्या आई-वडिलांनी तिला पळवून राजस्थानमध्ये नेल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबईच्या नया नगर पोलीस ठाण्यात पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे.

Wife Kidnapping Case
नवऱ्या मुलाचा आरोप
author img

By

Published : Jun 12, 2023, 10:13 PM IST

मुंबई: नवऱ्याने तक्रारीत म्हटले आहे की, लग्न झाल्यानंतर पत्नी माझ्याकडे राहायला आली. मालवणी पोलीस ठाण्यामध्ये पत्नी नवर्‍याकडे सुरक्षित राहत आहे, अशा प्रकारचा अर्ज द्यायला गेली. त्याच्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला पळवून नेले. ती घरी परत न आल्याने तिला राजस्थानमध्ये तिच्या आई-वडिलांनी नेल्याचा त्या मुलाने आरोप केला आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे कर्तव्यावर असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तक्रारकर्त्या तरुणाला सांगितले की, तिला तिच्या आई-वडिलांकडे जाऊ दे, असा देखील त्याने त्या संदर्भात आरोप केलेला आहे.

काय आहे घटनाक्रम? फैजल अन्सारी या तरुणाने धर्मांतरणानंतर हिंदू मारवाडी नाव धारण केले आणि एका हिंदू मुलीशी विवाह केला. 26 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे लग्न झाले तर 8 जुलै 2022 रोजी त्यांनी अधिकृत लग्न केल्याचे विवाह प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेकडून मिळवले देखील आहे. लग्न झाल्यानंतर त्याने साहिल चौधरी असे नवीन नाव धारण केले. लग्नानंतर त्याची बायको त्याच्याकडे राहायला आली. चार दिवसानंतर ती मुंबईतील नया नगर पोलीस ठाण्यात अर्ज देण्यासाठी गेली होती.

काय आहे नोटीसमध्ये? मुलगी मेनका हिरालाल चौधरी तिच्यामार्फत तिच्या आई-वडिलांनी राजस्थान येथून जावयाला नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये नमूद केलेले आहे की, जर हिंदू मुलगी असली तर एखाद्या मुलाने हिंदू धर्म धारण केला असेल, तरच ती मुलगी त्या मुलाशी लग्न करू शकते. मात्र हा मुलगा हिंदू नाही. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी त्या नोटिसीमध्ये फैज अन्सारी याच्या नावे आरोप देखील केलेला आहे की, तिला खोटे सांगून फूस लावून हे लग्न केले आहे. एक हिंदू महिला दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत विवाह करू शकत नाही.

मुलाने मांडली स्वत:ची बाजू: या नोटीसीच्या संदर्भात उत्तरादाखल साहिल चौधरी यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. हा तरुण मुंबई मालादला कॉलेजात शिकत असताना हिंदू मुलीच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांनी रीती-रिवाजाप्रमाणे लग्न केले. मुलाला हिंदू धर्माचे रितीरिवाच आवडल्यामुळे त्याने हिंदू धर्म विधिवत स्वीकारला. यानंतर फैज अंसारीने साहिल चौधरी असे नाव धारण केले. तो लग्नानंतर पत्नीसोबत राहत आहे, या प्रकारची नोटीस मालवणी पोलीस ठाण्यात द्यायला गेल्यानंतर पत्नीला तिच्या आई-वडिलांनी राजस्थानला पळवून नेले, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

मुंबई हायकोर्टाची दखल: दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने या संदर्भातले सगळे मूळ दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे अवलोकन केले. त्यानंतर ही 'हेबियस कॉर्पस' याचिका असल्यामुळे याची गंभीरपणे दखल घेतली. त्या संदर्भात खंडपीठाने मुलगी कुठे आहे, असा प्रश्न मुलीच्या वकिलांना केला. तिला 20 जून 2023 रोजी पुढील सुनावणीच्या वेळी हजर करा, असे आदेशही दिले; कारण उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे अन्सारीने हिंदू धर्म स्वीकारला आणि त्याने लग्न केल्याचे सर्व सरकारी कागदपत्र पटलावर आहेत; परंतु मुलीचे काय म्हणणे आहे, हे ऐकूण घेणे आवश्यक असल्याचे म्हणत 20 जून 2023 रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

काय म्हणाला साहिल? मुलगा फैज अन्सारी (साहिल चौधरी) 'ईटीव्ही भारत' सोबत बोलला असता त्याने सांगितले की, तो आधी मुस्लिम होता. त्याने नंतर हिंदू धर्म स्वीकारला. याचे मूळ कागदपत्रे देखील 'ईटीव्ही' प्रतिनिधीकडे सुपूर्द केले. प्रेयसीच्या प्रेमामुळे आणि हिंदू धर्माच्या प्रभावाखाली त्याने हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यानंतर लग्न केले. त्याने एके दिवशी पत्नीला मालवणी नया नगर पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करण्यासाठी नेले असता तेथून तिचे आई-वडील तिला राजस्थानमध्ये घेऊन गेले. त्यामुळे ती हरविली असल्याची तक्रार देखील त्याने केली असल्याचे सांगितले. मुलाच्या वतीने वकील शदाब फोफेकर आणि वकील सलमान खान यांनी बाजू मांडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.