ETV Bharat / state

मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा, बकरी ईदच्या कुर्बानीसाठी नियम शिथील करण्याची मागणी

राज्यात बकरी ईदसाठी राज्यात काही नियम शिथील करण्यात यावेत. कुर्बानीसाठी बकरे सहजपणे बाजारात मिळतील अशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी आज (सोनवार) राज्यातील मुस्लिम आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Muslim MLA meet Sharad Pawar
मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा
author img

By

Published : Jul 27, 2020, 8:11 PM IST

मुंबई - राज्यात बकरी ईदसाठी काही नियम शिथील करण्यात यावेत. कुर्बानीसाठी बकरे सहजपणे बाजारात मिळतील अशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी आज (सोनवार) राज्यातील मुस्लिम आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मागील अनेक दिवसांपासून सरकारकडे आम्ही याचा पाठपुरावा करतोय, परंतु समाधानकारक उत्तर आले नसल्याने, आपणच आता पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या आमदारांनी केली असल्याचे सांगण्यात आले. पवार हे मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील, असा विश्वास यावेळी मुस्लिम आमदारांकडून व्यक्त करण्यात आला.

Muslim MLA meet Sharad Pawar
मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवारांची समाजावादी पक्षाचे आमदार अबू आझमी, माजी आमदार व काँग्रेसचे नेते नसीम खान, माजी आमदार बाबा सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदींसोबतच पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते.

यावेळी अबू आझमी म्हणाले की, आज आमचे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ऐकले असून, त्यांच्याकडेही आम्ही बकरी ईदसाठी कुर्बानीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. बकरे ऑनलाईन खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे, मात्र ‍ ज्या गाड्यांमधून बकरे आणले जात आहेत, ते ठिकठिकाणी अडवले जात आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. आम्हाला सरकारने मागे म्हटले की, प्रतिकात्मक कुर्बाणी द्यावी, परंतु, तशी आम्हाला देता येणार नाही. यामुळे सरकारने आमच्या भावनांचा विचार करून बकरी ईदसाठी नियमावली तयार करावी अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेणार आहोत. यासाठीचा कार्यक्रमच आम्ही सादर केला असून, तोच कार्यक्रम घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या बैठकीत आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाले असून, आता सरकारकडून त्यासाठी लवकर नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी यावेळी मुस्लिम आमदारांनी केली होती अशी माहितीही देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.