मुंबई- मुंबईतील कोकरी आगार,वडाळा येथील न्यू म्हाडा वसाहतीत रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास वसंतकुमार देवेंद्र या 31 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, न्यू म्हाडा वसाहत येथील, बिल्डिंग नंबर ए-7 मध्ये राहणाऱ्या वसंतकुमार देवेंद्र याचं काही दिवसांपूर्वी परिसरात राहणाऱ्या काही व्यक्तींसोबत वाद झाला होता .
कोयत्याने वार करून ठार मारले
![31 वर्षीय तरुणाचा खून](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-31-murder-7201159_31052021100239_3105f_1622435559_756.jpg)
रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास यातील दोन आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून वसंतकुमार यास कोयत्याने वार करून ठार मारले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून यातील मुख्य आरोपी बाला नादर व त्याच्या इतर सहकार्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा- भाच्यानेच मामाचा तलवारीने चिरला गळा; एकास अटक, दुसरा फरार