ETV Bharat / state

कोरोना : 'सेफ्टी किट'साठी पालिकेच्या शताब्दी, देसाई रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन - 'सेफ्टी किट'साठी पालिकेच्या शताब्दी, देसाई रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसल्याने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी वॉर्डच्या बाहेर आहेत तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Apr 4, 2020, 1:12 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूची दहशत सर्वत्र पसरली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसल्याने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी वॉर्डच्या बाहेर आहेत तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

कोरोनाचे मुंबईत आतापर्यंत 306 रुग्ण आढळून आले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 537 रुग्ण असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने आपल्या इतरही रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास सुरुवात केली. तर पालिकेने खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली असून त्यामध्येही उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या रुग्णालयात सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे.

कांंदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णांना भरती करण्यात आले आहे. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. आधी सेफ्टी किट द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उद्यापासून कोरोनावर उपचार केले जाणार आहेत. मात्र त्याठिकाणी सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. सेफ्टी किट दिले जाणार आहे की, नाही यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.