ETV Bharat / state

पालिका महालक्ष्मी येथे बांधणार केबल दोरखंडांचा भव्य पूल, 'इतका' होणार खर्च - महालक्ष्मी

पश्‍चिम रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीच्या वादात अडकलेला महालक्ष्मी पूलाचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी येथे केबल दोरखंडाचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महापालिका
बृहन्मुंबई महापालिका
author img

By

Published : Dec 23, 2019, 1:29 AM IST

मुंबई - पश्‍चिम रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीच्या वादात अडकलेला महालक्ष्मी पूलाचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी येथे केबल दोरखंडाचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर पालिका 300 कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिका आणि रेल्वे आपल्या हद्दीतील पूलाचे बांधकाम करणार आहे.

महालक्ष्मी उड्डाणपूल शंभर वर्षांपूर्वी जूना आहे. तो जीर्ण झाल्यामुळे धोकादायक बनला आहे. या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याची गरज आहे. मात्र, रेल्वे आणि पालिकेच्या हद्दीमुळे निर्णय घेतला जात नव्हता. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका संयुक्त बैठकीतून या पूलाच्या अडचणी दूर केल्या होत्या. आता रेल्वे आणि पालिका यांच्या समन्वयातून पूलाचे बांधकाम केले जाणार आहे.

हेही वाचा - विलेपार्ल्यात बहुमजली इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

नवा दोरखंडी पूल या भागाचे आकर्षण ठरणार असून त्यासोबत ई मोजेस रोड वरळी पासून हाजी अलीकडे दुसरा पूल तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाने दिली. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटेल. या पूलांची कामे टप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. सातरस्ता ते केशवराव खाडे मार्ग (हाजी अली) अशी वाहतूकीला वाट मोकळी मिळाल्यास महालक्ष्मी स्थानकाजवळ कोंडी होणार नाही, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा - बेकायदा पार्किंगचा दंड कमी होण्याची शक्यता, पालिकेकडून लवकरच होणार घोषणा

Intro:मुंबई - पश्‍चिम रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीच्या वादात अडकलेला महालक्ष्मी पूलाचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी येथे केबल दोरखंडाचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर पालिका 300 कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिका आणि रेल्वे आपल्या हद्दीतील पूलाचे बांधकाम करणार आहे. Body:महालक्ष्मी उड्डाणपूल शंभर वर्षांपूर्वी जूना आहे. तो जीर्ण झाल्यामुळे धोकादायक झाला आहे. याठिकाणी नव्याने पूल बांधण्याची गरज आहे मात्र रेल्वे आणि पालिकेच्या हद्दीमुळे निर्णय घेतला जात नव्हता. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका संयुक्त बैठकीतून या पूलाच्या अडचणी दूर केल्या होत्या. आता रेल्वे आणि पालिका यांच्या समन्वयातून पूलाचे बांधकाम केले जाणार आहे.

नवा दोरखंडी पूल या भागाचे आकर्षण ठरणार असून त्यासोबत ई मोजेस रोड वरळी पासून हाजी अलीकडे दुसरा पूल तयार करण्यात येणार असल्याची माहित माहिती पालिकेच्या पूल विभागाने दिली. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटेल. या पूलांची कामे टप्प्याने टप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. सातरस्ता ते केशवराव खाडे मार्ग (हाजी अली) अशी वाहतूकीला वाट मोकळी मिळाल्यास महालक्ष्मी स्थानकाजवळ कोंडी होणार नाही असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.