ETV Bharat / state

Doctors Strike In Mumbai महापालिका रुग्णालयातील २ हजार डॉक्टर संपावर, मुंबईतील ओपीडी सेवा बंद

महापालिकेच्या रुग्णालयातील ( Municipal Corporation Hospitals ) 2 हजार डॉक्टरांनी संपात सहभाग घेतल्याने रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील काम ठप्प ( Hospitals OPD Closed In Mumbai ) झाले आहे. राज्य सरकार आणि महानगर पालिकेने डॉक्टरांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मार्ड ( MARD Doctors On Strike ) या डॉक्टरांच्या संघटनेने ( 2 Thousand Doctor Participated In Strike ) केला आहे. 2 हजार डॉक्टर संपात उतरल्याने शहरातील वैद्यकीय सेवांचा बोजवारा उडाला आहे.

Doctors Strike In Mumbai
महापालिका रुग्णालयातील २ हजार डॉक्टर संपावर
author img

By

Published : Jan 2, 2023, 1:44 PM IST

मुंबई - निवासी डॉक्टरांनी ( MARD Doctors On Strike ) आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका ( Municipal Corporation Hospitals ) यांच्याकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन ( 2 Thousand Doctor Participated In Strike ) सुरू केले आहे. या आंदोलनात मुंबई महानगरपालिकेतील २ हजार निवासी डॉक्टर उतरल्याने ओपीडी सेवा ( Hospitals OPD Closed In Mumbai ) तसेच वार्डमधील सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Doctors Strike In Mumbai
महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर संपावर

मार्डचे काम बंद आंदोलन महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महापालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात आजपासून सात हजार निवासी डॉक्टरांनी ( Resident Doctor On Strike ) काम बंद आंदोलन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ( Municipal Corporation Hospitals ) केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमध्ये २ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. या डॉक्टरांना कोविड काळातील भत्ता देण्यात आलेला नाही. हा भत्ता देण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेला महापालिका प्रशासन किंवा अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी चर्चेला बोलावलेले नाही. यामुळे महापालिका रुग्णालयातील २ हजार डॉक्टर काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

डॉक्टरांची निदर्शने आजपासून राज्यभरामध्ये ७ हजार निवासी डॉक्टर काम बंद आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबई महापालिकेतील ( Doctors Strike In Mumbai ) २ हजार निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज सकाळी सर्व रुग्णालयातील निवासी डॉक्टर नायर रुग्णालयात जमले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी निदर्शने केली. त्यानंतर केईएम, सायन आदी रुग्णालयातही निवासी डॉक्टरांनी ( Mard Doctors On Strike ) निदर्शने केली. आज सकाळपासून सर्व निवासी डॉक्टर काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ओपीडी आणि वॉर्डमध्ये निवासी डॉक्टर ( 2 Thousand Doctor Participated In Strike ) सेवा देण्यासाठी गेलेले नाहीत. मात्र अत्यावश्यक सेवेत निवासी डॉक्टर काम करत असल्याची माहिती महापालिका मार्डचे डॉ. प्रवीण ढगे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.