मुंबई - मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या शेकडो लोकांची महापालिका प्रशासनाने काळजी घेतलेली नाही. तर दुसरीकडे रस्त्याच्याकडेला पालांवर राहणारे शेकडो लोक अद्यापही आपल्या पालात आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपल्याला सुरक्षितस्थळी ठेवण्याची कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईमध्ये निसर्ग वादळ येऊन धडकण्याची शक्यता असतानाच, मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर, मंडला गाव, चिता कॅम्प, साठे नगर, परिसरातील अनेक लोक पालात आणि कच्च्या झोपड्यांमध्येच आहेत. आपल्याला महापालिकेने कसलीही माहिती दिली नाही. त्यामुळे अजूनही आम्ही लहान मुलाबाळांसह येथेच राहत असलेल्या ताराबाई यांनी सांगितले.
मानखुर्द पश्चिमेला पीएमजीपी कॉलनी शेजारी साठेनगर हा अत्यंत मोठा परिसर झोपडपट्टीने व्यापलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच मराठवाड्यातील गोरगरीब जनता राहते. त्यांची घरी कच्ची असूनही महापालिका प्रशासनाने त्यांना कुठेही सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था केलेली नाही.