मुंबई - राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचलेली आहे. यातील १६ रुग्ण मुंबईत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी राज्य सरकार विविध उपयोजना करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी टाळा, असे आवाहन केले होते. मात्र, मुंबईकरांनी याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - 'कोरोना' प्रभाव : 27 वर्षात पहिल्यांदाच मुंबईतील 'फॅशन स्ट्रीट' होणार बंद !
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना गर्दी टाळा, गरज असल्यास घरातून बाहेर पडा, असे आवाहन केले होते. मात्र, मुंबईतील रस्ते वाहतुकीत काही विशेष बदल झाला नसल्याचे चित्र आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर नेहमी प्रमाणेच वाहने धावत होती. यामध्ये रिक्षा, टॅक्सी, माल वाहतूक, दुचाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती. जरी सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी खासगी वाहने असणारे मुंबईकर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जास्त गंभीरपणे घेताना दिसत नाहीत.
हेही वाचा - कोरोना उपचाराच्या जाहिराती कराल तर खबरदार..! - राजेद्र शिंगणे