ETV Bharat / state

पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकर मोफत लसीपासून वंचित; भाजप खासदाराचा आरोप

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली मोफत लस मुंबई महापालिका प्रशासनाने खासगी हॉस्पिटलला दिली. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकरांना मोफत लसीपासून वंचित राहावे लागले आहे, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केला.

manoj kotak accusation Mumbai mnc vaccination
पालिका नियोजनशून्य कारभार मनोज कोटक
author img

By

Published : May 8, 2021, 5:07 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली मोफत लस मुंबई महापालिका प्रशासनाने खासगी हॉस्पिटलला दिली. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकरांना मोफत लसीपासून वंचित राहावे लागले आहे, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केला. या आरोपामुळे मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.

माहिती देताना भाजप खासदार मनोज कोटक

हेही वाचा - मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 40 किलो गांजा जप्त

..तर मुंबईकरांना मोफत लस मिळाली असती

मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला. मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीला हे लसीकरण पालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात सुरू होते. लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे आणि पालिका रुग्णालयावरील ताण कमी करावा म्हणून पालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू केले. त्यासाठी खासगी केंद्रांनी लसीकरणासाठी २५० रुपये दर आकारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती. महापालिकेला लसीचा जो साठा आला त्यामधील लसीचा साठा पालिकेने खासगी रुग्णालयांना दिला. त्या बदल्यात एका लसीच्या डोसमागे १५० रुपये पालिकेने घेतले.

खासगी केंद्रात ६ लाख ३० हजार डोस

मुंबईत महापालिकेची ७२, राज्य आणि केंद्र सरकारची १७, तर खासगी ७४ लसीकरण केंद्रे आहेत. या लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण २६ लाख २१ हजार ८९४ लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यात महापालिकेच्या केंद्रांवर १७ लाख ५८ हजार १९०, राज्य आणि केंद्र सरकारच्या केंद्रांवर २ लाख ३२ हजार ७२०, तर खासगी केंद्रांवर ६ लाख ३० हजार ९८४ डोस देण्यात आले आहेत. वास्तविक पाहता केंद्राने लस महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि महापालिकेला पाठवली, त्यातील किती लस पालिकेच्या केंद्रांवर मारावी आणि किती लस खासगी हॉस्पिटलमध्ये मारावी याचे काही निर्देश दिले नव्हते. ते ठरवण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेचा होता. महानगरपालिकेने त्यावेळी जास्त केंद्र उघडली असती, स्वतःची क्षमता जास्त वाढवली असती तर ती सर्व लस मुंबईकरांना फुकट मिळाली असती, असे खासदार मनोज कोटक यांनी म्हटले. दरम्यान याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत आतापर्यंत एकूण 26 लाख 21 हजार 894 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 20 लाख 16 हजार 14 लाभार्थ्यांना पहिला, तर 6 लाख 5 हजार 880 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 89 हजार 964 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 40 हजार 257 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 55 हजार 931 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार व इतर 9 लाख 18 हजार 826, तर 18 ते 44 वर्षांमधील 16 हजार 916 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध, तसेच 45 ते 59 वर्षांमधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी - 2,89,964
फ्रंटलाईन वर्कर - 3,40,257
जेष्ठ नागरिक - 10,55,931
45 ते 59 वय - 9,18,826
18 तर 44 वय - 16,916
एकूण - 26,21,894

हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली उपसमितीची महत्वाची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.