नांदेड - बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तेलंगणातील तानुर येथून ताब्यात घेतले आहे. साईनाथ लिंगाडे असे या आरोपीचे नाव आहे.
16:37 May 24
बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज हत्याप्रकरण : आरोपी पोलिसांच्या ताब्यात

14:42 May 24
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात, केंद्रीय पथकाने आकडा वाढण्याची वर्तविली होती शक्यता - उद्धव ठाकरे
मुंबई - आगामी काळात महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी, राज्य सरकार योग्य ती पाऊले उचलत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
उद्धव म्हणाले, 'महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख रुग्ण असतील, असा अंदाज केंद्राच्या पथकाचा होता. दरम्यान सद्य घडीला ४७ हजार १९० कोरोना रुग्ण आहेत. यात ३३ हजारांच्या आसपास रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उर्वरित जवळपास १३ हजार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.' असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या पथकाने वर्तवलेला अंदाज पाहता, त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असे ठाकरे यांनी सांगितलं.
10:40 May 24
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचा राजीनामा, खळबळजनक केले आरोप
वर्धा - सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू यांनी राजीनामा दिला आहे. सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी बिनबुडाचे आरोप लावल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले. आपल्याविरोधात सुरू असलेला दुष्प्रचार आणि चुकीच्या आरोपांमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.
10:40 May 24
खरीप हंगामासाठी 8 हजार कोटींची तरतूद; 11 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
सातारा - काही दिवसांवर असलेल्या खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकऱ्यांना 8 हजार कोटींची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. ते साताऱ्यात बोलत होते.
10:33 May 24
बाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा गळा दाबून खून, मारेकरी फरार
नांदेड - बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात मारेकऱ्यांनी महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. त्यानंतर महारांजाची गळा दाबून हत्या केली. मारेकरी महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले. त्यामुळे मारेकऱ्यांनी पळ काढला. दरम्यान, महाराजांचे पार्थिव उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सोबत मठामध्ये आणखी एकाचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
10:33 May 24
CoronaVirus : मुंबईत 198 कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 आयसीयूमध्ये
मुंबई - मुंबई शहर व उपनगरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाचे 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत एकीकडे कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नसताना पालिकेने रुग्णालयातील रुग्णांची काहीशी चिंता वाढवणारी आकडेवारी जाहीर केली आहे.
10:27 May 24
योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी, आरोपीला मुंबईतून अटक
मुंबई - योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. या प्रकरणी एटीएसच्या पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. कामरान अमीन खान (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे.
10:02 May 24
मुंबई - योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्या प्रकरणी एटीएसच्या पथकाने मुंबईतून कामरान अमीन खान नावाच्या २५ वर्षीय युवकाला अटक केली आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात मुंबईत कोरोनाचे 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या सारख्या राज्यभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा लाईव्ह आढावा...