ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा ५० वा वर्धापन दिन संपन्न - मुंबई लेटेस्ट न्युज

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शिक्षणापासून वंचित असलेल्या विविध स्तरातील सर्व विद्यार्थ्यांना यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नवीन संकल्पना सृजनशीलता व विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन प्रेरणेची क्षमता विकसित केली आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Mar 24, 2021, 10:36 PM IST

मुंबई - आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगात मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे (आयडॉल) महत्त्व अनन्यसाधारण असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयडॉलने विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली आहे. मुंबई विद्यापीठाने पन्नास वर्षांपूर्वी दूरस्थ शिक्षणाची संकल्पना स्वीकारली. ही संकल्पना आजच्या परिस्थितीत किती उपयोगी पडत आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. असे प्रतिपादन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी केले आहे. ते मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोगी ठरेल
आशिषकुमार चौहान हे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शिक्षणापासून वंचित असलेल्या विविध स्तरातील सर्व विद्यार्थ्यांना यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नवीन संकल्पना सृजनशीलता व विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन प्रेरणेची क्षमता विकसित केली आहे. भविष्यात दुरस्थ शिक्षणाचे उपक्रम भारतीय राष्ट्र निर्मितीसाठी व सामाजिक विकासासाठी उपयोगी पडतील. त्यामुळे भारताचे स्थान जागतिक स्तरावर सर्वोत्तम असेल, असे चौहान म्हणाले.

राज्यपालांनी दिल्या आयडॉलला शुभेच्छा
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आयडॉलच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी कोविड-१९ च्या काळात देखील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षणात मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला. विशेष करून यामध्ये समाजातील जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहेत. असा संदेश देऊन त्यांनी आयडॉलच्या ५० व्या वर्धापनदिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

एकलव्य पुस्तकाचे प्रकाशन
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांच्या हस्ते "एकलव्य" या नियतकालिकेचे व आयडॉल एक ओळख या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी या प्रसंगी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी आयडॉलच्या मागील पन्नास वर्षाचा आढावा घेतला आणि पुढील वर्षांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम व अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-..अन् पंतप्रधानांनी धरले कार्यकर्त्याचे पाय; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.