मुंबई: विद्यापीठाची MCA अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवार दि.२७ फेब्रुवारी,२०२३ पासून सुरू होणार आहे. अजूनही परीक्षार्थींना परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्र (Hall Ticket) देण्यात आले नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्यासाठी परीक्षा फी देखील भरलेली आहे. कमीत कमी एका विद्यार्थ्याला वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो आणि जर परीक्षा हॉल तिकीट देता आले नाही तर काय करायचे या चिंतेमध्ये अनेक विद्यार्थी आहेत.
कशी द्यायची परीक्षा? मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे 700 ते 800 महाविद्यालये आहेत. मुंबई ,रायगड, पालघर, ठाणे अशा मुंबई महानगर विकास प्राधिकरण अखत्यारित लाखो विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी हजारो विद्यार्थ्यांनी मास्टर ऑफ कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन या अभ्यासासाठी प्रवेश घेतलेला आहे. मात्र हजारो विद्यार्थ्यांना आपले प्रवेश झालेले आहे. परंतु परीक्षेसाठीच हॉल तिकीट अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे ही परीक्षा आपली होणार का, आपले वर्ष तर वाया जाणार नाही ना याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना लागून आहे.
प्रशासनाचे हात वर: यासंदर्भात मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी प्रफुल्ल पाटील याने ई टीवी भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, गेल्या आठ दिवसापासून आम्ही सर्व मुंबई विद्यापीठाकडे विचारणा करीत होतो की, आमचे हॉल तिकीट कधी मिळणार. यावर त्यांनी सांगितले की, परीक्षेच्या या कालावधीत मिळणार. परंतु उद्या आमची परीक्षा आहे. तरीही प्रशासनाकडून अद्यापही हॉल तिकीट देण्यात आलेले नाही. यामुळे आम्हाला परीक्षा देता येईल किंवा नाही याबाबत शंका आहे.
युवासेनेने दर्शविला निषेध: हिरे महाविद्यालय, बांद्रा येथील विद्यार्थ्यांनी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे आज सायंकाळी केंद्र देण्यात आले. उद्या प्रवेशपत्र घेण्याकरिता महाविद्यालयात बोलावण्यात आले आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार प्रभारी अधिकाऱ्यांचा युवासेना निषेध करीत आहोत. या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनासोबत ईटीवी भारतच्या वतीने संपर्क करून याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाकडून किंवा जनसंपर्क विभागाकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची यासंदर्भातली कारवाई काय असेल हे समजू शकले नाही.
तर विद्यार्थ्यांचे नुकसान: विद्यार्थ्यांनी एका वर्षासाठी 75 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत या अभ्यासक्रमासाठी खर्च केलेला आहे. अनेक विद्यार्थी गरीब आणि निम्न मध्यवर्गीय आहे. तर कोणी दारिद्र रेषेखालील उत्पन्न गटातील विद्यार्थी आहेत. त्यांनी उधारी करून या अभ्यासक्रमासाठी फी भरलेली आहे. त्यांना जर वेळेमध्ये परीक्षा प्रवेश पत्र मिळाले नाही तर त्यांचे पैसे आणि शैक्षणिक वर्ष वाया जाणार. विद्यापीठाने त्वरित हॉल तिकीट देणे ही साधी बाब विद्यार्थ्यांकडून मागणीच्या रूपाने होत आहे.