ETV Bharat / state

Mumbai University News : विद्यार्थी चिंतामुक्त! मुंबई विद्यापीठाच्या एमसीए विद्यार्थ्यांना मिळाले हॉल तिकीट, परीक्षा सुरू - मुंबई विद्यापीठामध्ये 27 फेब्रुवारी पासून परिक्षा

मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठामध्ये 27 फेब्रुवारी 2023 पासून मास्टर ऑफ कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशनची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र त्याचे हॉल तिकीट 25 फेब्रुवारी पर्यन्त विद्यार्थ्यांना मिळालेले नव्हते. त्यामुळे हजारो विद्यार्थी चिंतेत होते. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेआधी हॉल तिकीट प्राप्त झाले.

Mumbai University
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Feb 27, 2023, 2:41 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठात मास्टर ऑफ कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवार अखेरपासून सुरु झाली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीदेखील परीक्षार्थींना परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्र देण्यात आले नसल्यामुळे काही विद्यार्थी हवालदिल झाले होते. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्यासाठी परीक्षा फी देखील भरलेली आहे. कमीत कमी एका विद्यार्थ्याला वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो. जर परीक्षा हॉल तिकीटमुळे जर देता आले नाही. तर काय करायचे या चिंतेमध्ये अनेक विद्यार्थी होते. मात्र आता ज्यांचे हॉल तिकीट मिळाले नव्हते. ते त्यांना दिले गेल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

12 वी परिक्षेमुळे सेंटर बदल : मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे 700 ते 800 महाविद्यालय आहेत. मुंबई ,रायगड, पालघर, ठाणे अशा मुंबई महानगर विकास प्राधिकरण अखत्यारीत लाखो विद्यार्थी शिकत आहे. त्यापैकी हजारो विद्यार्थ्यांनी मास्टर ऑफ कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन या अभ्यासासाठी प्रवेश घेतलेला आहे. मात्र काही विद्यार्थ्यांना आपले परीक्षेसाठीचे हॉल तिकीट अद्याप मिळालेले नव्हते. त्यामुळे आपली ही परीक्षा होणार का ? आपले वर्ष तर वाया जाणार नाही ना? यामध्ये ते आणि त्यांचे पालक फार चिंतेत होते. मात्र 12 वी परीक्षेच्या कारणास्तव एका महाविद्यालयमध्ये सेंटर बदल केले गेले होते. त्यामुळे कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन या परीक्षेचे सेंटर बदलले गेले होते.

हॉल तिकीट विद्यार्थ्यांना प्राप्त झाले : ह्या प्रकरणी मुंबई विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संपर्क साधला असता, त्यांनी खुलासा केला की, मुंबईतील केवळ एका सेंटरमधील विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्याच्यापर्यंत पोहोचले नव्हते. याचे कारण त्या ठिकाणी बारावीची परीक्षा होती. त्यामुळे तिथल्या एमसीएच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटर बदलण्यात आले होते. आता त्या विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट मिळाले असल्यामुळे सर्वांना कोणत्याही अडचणी विना परीक्षा देता येत आहे.

विद्यार्थ्यांची चिंता मिटली : यासंदर्भात मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी प्रफुल्ल पाटील याने ईटीवी भारतसोबत संवाद साधताना सांगितले की गेल्या आठ दिवसापासून आम्ही सर्व मुंबई विद्यापीठाकडे विचारणा करीत होतो की, आमचे हॉल तिकीट कधी मिळणार? मात्र आता हॉल तिकीट मिळाले असल्याने चिंता मिटली आहे, असे त्यांना सांगितले.

अधिकारी यांनी चोख नियोजन करावे : हिरे महाविद्यालय, बांद्रा येथील विद्यार्थ्यांनी युवासेना माजी सिनेट सदस्य श्री. प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला प्रभारी अधिकारी जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांनी एका वर्षासाठी 75 हजार ते एक लाख रुपयेपर्यंत या अभ्यासक्रमासाठी खर्च केलेला आहे. अनेक विद्यार्थी गरीब आणि निम्न मध्यवर्गीय आहेत. दारिद्र रेषेखालील उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांनी उधारी करून या अभ्यासक्रमासाठी फी भरली होती. त्यांना परीक्षा प्रवेश पत्र आता मिळाले असून त्यांची चिंता दूर झाली आहे.

हेही वाचा :Maharashtra Politics: राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकऱ्यांसाठी ठेंगा- नाना पटोले; नामांतरापेक्षा जिल्ह्यांच्या विकासाकडे लक्ष द्या- सत्यजीत तांबे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.