ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची छाप; बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी केली भरीव तरतूद

शुक्रवारी मुंबई विद्यापीठाचा 2020-21 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आला. या अर्थसंकल्पात शिवसेनेची छाप दिसून आली. या अर्थसंकल्पात विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Mar 15, 2020, 12:21 PM IST

मुंबई - राज्यात झालेल्या सत्ता बदलाचे पडसाद मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पावर ही उमटले. शुक्रवारी मध्यरात्री मुंबई विद्यापीठाचा 809.24 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थसंकल्पात शिवसेनेची छाप दिसून आली आहे. या अर्थसंकल्पात विद्यापीठाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी तब्बल नऊ कोटीची तरतूद केली आहे. शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना खुश करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत शुक्रवारी रात्री उशिरा विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय देशमुख यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचा 66.80 कोटी तूट असलेला 809.24 कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. तो रात्री साडेबाराच्या सुमारास मंजूर झाला. या अर्थसंकल्पात विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आली आहे.

यामध्ये विद्यापीठ उपपरिसरातील पायाभुत सुविधा (सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे), डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस, शैक्षणिक सुविधा (नविन अभ्यासक्रम व त्यासंदर्भातील उपक्रम), स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, अपग्रेडेशन ऑफ आयसीटी इंफ्रास्ट्रक्चर, डिजीटल लायब्ररी, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा नाविण्यपूर्ण बाबींवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा - बॉक्स ऑफिसला कोरोनाचा फटका, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह राहणार बंद

'या' नियोजित बांधकामांनाही प्राधान्यक्रम

  • स्कुल ऑफ लॅंग्वेजेस इमारत (दुसरा टप्पा)
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (दुसरा टप्पा)
  • चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान (टाईप-२)
  • नविन ग्रंथालय इमारत
  • नविन परिक्षा भवन
  • प्रो. बाळ आपटे दालन
  • मुलींचे नविन वसतिगृह
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (पहिला टप्पा), श्री. राजीव गांधी इमारत (दुसरा टप्पा)
  • वर्कशॉप इमारतीची दुरुस्ती
  • महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहाची दुरुस्ती
  • आय. टी. पार्क इमारत (आतील कामे)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.