ETV Bharat / state

Naqi Ahmad Shaikh Hunger Strike : तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नकी अहमद शेखचे तुरुंगात उपोषण, खटला जलद गतीने चालवण्याची मागणी - तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नकी अहमद शेख

मुंबईतील 13 जुलै 2011 मधील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नकी अहमद शेख यांनी खटल्याची सुनावणी लवकर सुरु करावी यासाठी न्यायालयातच अमरण उपोषण सुरु केले आहे. या प्रकरणाला 11 वर्ष झाले तरी खटला जलद गतीने सुरु नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी जलद गतीने घ्यावी असे शेख यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात एटीएसने 2012 मध्ये शेक यांना अटक केली होती. या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात 27 लोकांचा मृत्यू तर, 130 हून अधिक जखमी झाले होते.

Naqi Ahmad Shaikh Hunger Strike
खटला जलद गतीने चालवण्याची मागणी
author img

By

Published : Jan 28, 2023, 6:27 PM IST

मुंबई : सत्र न्यायालयातील विशेष एटीएस कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान आरोपी नकी अहमद शेख याला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने शेखच्या याचिकेला अंशत परवानगी दिली आहे. खटला जलदगतीने चालवला जाऊ शकतो. खटला सुरु ठेवण्यासाठी फिर्यादी, बचाव पक्षाला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

2011 पासून तुरुंगात : कोर्टाने म्हटले आहे की, अंडरट्रायल कैद्यांची इतर प्रकरणे प्रलंबित असल्याने दैनंदिन खटला चालवणे शक्य नाही. 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 27 ठार झाल्याच्या आरोपाखाली शेख 2011 पासून तुरुंगात आहे. हा खटला अद्याप सुरु झालेला नाही. यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकने काही आरोपींवर खटला चालविण्याचा प्रयत्न केला होता. नकी अहमद शेख यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत खटला सुरु होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरु राहील. मी 11 वर्ष प्रदीर्घ कारावास खटलापूर्व शिक्षा भोगली आहे. त्यामुळे कटला जलद चालवून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.

11 वर्षांहून अधिक तुरुंगवास : मी न्यायालयाला वारंवार सरकार्य केले आहे. तरीदेखील खटला जलद गतीने चालण्यात येत नाही. 11 वर्षांहून अधिक काळ मी तुरुगवास भोगला आहे. विशेष सरकारी वकीलाच्या सोयीनुसार खटला चलवला जातो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अनेक जलद गतीने चालवलेल्या खटल्याचा देखील याचिकेत संदर्भ दिला आहे.

खोट्या प्रकरणात गोवले : शेखने आपल्या याचिकेत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एटीएसने खोट्या प्रकरणात मला गोवले आहे. तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी मुंबईतील दहशतवादी संशयितांना पकडण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो, दिल्ली स्पेशल सेलला तपासात मदत केल्याबद्दल मला सूडाच्या भावनेने या प्रकरणात गोवलेल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण : मुंबईमध्ये 13 जुलै 2011 रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार, दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता तर, 130 जण जखमी झाले होते. जानेवारी 2012 मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा, हारुन रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरारी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीहून मुंबईला नकी अहमदकडे स्फोटके पाठवल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - Mirage 2000 : 'शत्रू विनाशक' मिराज २००० लढाऊ विमान.. जाणून घ्या वैशिष्ट्ये अन् किंमत..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.