मुंबई : अनावश्यक हॉर्निंगमुळे ध्वनी प्रदूषण होते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वाहतूक पोलिसांनी 14 जून रोजी ‘नो हॉँकिंग डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोटार वाहन चालकांना मुंबई पोलीस वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी वाहन चालकांना या 'नो हॉकिंग डे' मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देवून आपली वाहने हॉर्न न वाजविता चालवावित, असे आवाहन केले आहे.
वाहतूक विभागाचे आवाहन : पुढे सहपोलीस आयुक्त प्रविण पडवळ यांच्याकडून मोटार वाहन चालकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या मोटार वाहनांचे हॉर्न केंद्रिय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम क्रमांक ११९ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे असल्याबाबत खात्री करावी. विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम १९४ (एफ), सीएमव्हीआर ११९(२)/१७७ मोटर वाहन कायदा तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ प्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. (अत्यावश्यक सेवा वाहने वगळून) तरी बुधवार 14 जूनला 'नो हॉकिंग डे' यशस्वी करण्यासाठी सर्व वाहन चालकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखा, मुंबई करीत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकांनी इतर दिवशी सुध्दा वाहनांचे हॉर्न विनाकारण वाजवू नयेत, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
हॉर्न वाजवण्यास बंदी : अनेकांना कर्कश हॉर्न हा त्रासदायक वाटतो. रुग्णालय आणि शाळा अशा शांतता हवी असलेल्या ठिकाणी हॉर्ण वाजवण्यास बंदी आहे. तरी देखील काही वाहन चालक आवश्यकता नसतानाही मोठ्याने हॉर्न वाजवतात. मुंबईत मात्र विनाकारण हॉर्न वाजवण्याचे प्रमाण जास्त आहे. इतर हॉर्न न वाजवण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात 66 वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा :