मुंबई: शुक्रवारी आज(दि. 4 फेब्रुवारी)रोजी मध्यरात्रीपासून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान महत्त्वाचा हा मेजर ब्लॉक आहे. हा मेजर ब्लॉक रूट रिले इंटरलॉकिंग प्रणाली तसेच पॅनल इंटरलॉकिंग प्रणाली या संदर्भातली दुरुस्ती करण्यासाठी हा मेजर ब्लॉक असेल. यामुळे शनिवारी मध्यरात्री हा मेजर ब्लॉक केला जाणार आहे. डाऊन हार्बरकडे जाणाऱ्या मार्गावरील रात्री बारा वाजून 40 मिनिटं ते पहाटे 4:40 पर्यंतचा हा मेजर ब्लॉक असणार आहे.
देखभाल तसेच दुरुस्ती: रेल्वे मार्गावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे सिग्नल तसेच रुळाला जुडवून अनेक वेगवेगळ्या तांत्रिक बाबी आहेत की, ज्यामुळे अहोरात्र रेल्वे व्यवस्थित आणि सुरळीत चालते. त्यामुळे ट्रेन गेल्यावर आपोआप सिग्नल पडते आणि ट्रेन येण्यापूर्वी देखील आपोआप सिग्नल पडते या पाठीमागे इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची यंत्रणा कार्यरत असते. त्यामध्ये अभियांत्रिकी अनेक बाबी असतात या सर्वांची तपासणी आणि देखभाल तसेच दुरुस्ती या मेजर ब्लॉक मध्ये पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून केली जाण्याचे सांगण्यात आले.
प्रवासाचे नियोजन करावे: या मेजर ब्लॉकच्या संदर्भात पश्चिम रेल्वे स्थानकाच्या मार्गावर सर्व दिव्या लोकल अंधेरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जलद रेल्वे मार्गावरून म्हणजे फास्ट ट्रॅक वरून चालवल्या जातील. त्यामुळे सर्व पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासांनी या संदर्भातली नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. ज्या उद्देशाने पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक आणि इंटरलॉकिंग प्रणालीच्या कामाची दुरुस्ती सुरू आहे. ते पाहता दिम्या मार्गावरून जाणाऱ्या बहुतेक ट्रेन या राम मंदिर रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना याची अडचण होऊ शकते.
या रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबणार नाही: पश्चिम रेल्वे वरील या दुरुस्ती देखभाल कामामुळे बोरिवली ते चर्चगेट या मार्गाने धावणाऱ्या अनेक जलद लोकल चालवल्या जातील. त्यामुळे जलद मार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांनी या संदर्भातली नोंद घेऊन त्याबाबतच्या प्रवासाचे नियोजन करावे. तसेच मध्यरात्रीनंतर शुक्रवार व शनिवारी पहाटे धावणाऱ्या रेल्वेसाठी राम मंदिर या रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबणार नाही. याची दखल देखील रेल्वे प्रवाशांनी घ्यावी. असे देखील पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा: Nahoor Railway Station मध्य रेल्वेवरील नाहूर रेल्वे स्थानकात गर्डर टाकण्याचे काम यशस्वी