ETV Bharat / state

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना तात्पुरता दिलासा, कोर्टाची पुढील सुनावणी 5 डिसेंबरला - Next hearing on 5th December

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने (MUMBAI SHIVDI MAGISTRATE COURT) काढलेल्या अजामीनपात्र वॉरंट (IN CASE OF BOGUS CASTE REGISTRATION CERTIFICATE) विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती. आज या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मूळ तक्रारदार यांनी अधिक वेळ मागितल्याने सुनावणी तहकूब करण्यात (GRANTED TEMPORARY RELIEF TO MP NAVNEET RANA) आली. तसेच पुढील सुनावणी 5 डिसेंबर ला होणार आहे.

MP Navneet Rana
नवनीत राणा यांना तात्पुरता दिलासा
author img

By

Published : Nov 25, 2022, 7:25 PM IST

मुंबई : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने (MUMBAI SHIVDI MAGISTRATE COURT) काढलेल्या अजामीनपात्र वॉरंट (IN CASE OF BOGUS CASTE REGISTRATION CERTIFICATE) विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती. यावर सरकारी वकील यांना मागील सुनावणी दरम्यान उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी लेखी स्वरुपात युक्तिवाद सादर केला आहे. मात्र आज मूळ तक्रारदार यांनी अधिक वेळ मागितल्याने सुनावणी तहकूब करण्यात (GRANTED TEMPORARY RELIEF TO MP NAVNEET RANA)आली आहे.

पोलीस कारवाई करणार नाही : खा. नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी सुनावणी आजच घेण्यासाठी अग्रही धरला होता. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पुर्ण झाला तरी तारीख का? असे मर्चंट यांनी मूळ तक्रारदार यांनी वेळ मागितल्या मुळे, याला विरोध करत प्रश्न विचारला आहे. मात्र पुन्हा मूळ तक्रारदार यांच्या विनंतीला अनुसरून या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच डिसेंबर पर्यंत तहकूब केली आहे. मात्र तोपर्यंत खा. नवनीत राणा विरोधातील शिवडी कोर्टानं बजावलेलं अटक वॉरंटवर पोलीस कारवाई करणार नाही, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई सत्र न्यायालयात तक्रार : बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची कारवाई केली होती. परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दंडाधिकारी न्यायालयाला अशाप्रकारे वॉरंट बजावण्याचे अधिकार नाहीत, अशी तक्रार नवनीत कौर राणा यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आली.

पिता-पुत्रीवर गुन्हा दाखल : जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.