मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार (Anil Deshmukh Financial Misappropriation) प्रकरणात ईडीने अटक केली आहे. याच प्रकरणातील सह आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Suspended Police Officer Sachin Vaze) यांनी या प्रकरणात जामीन मिळवण्याकरिता सेक्शन 88 अंतर्गत सत्र न्यायालयात अर्ज (Sachin Vaze Bail application) केला होता. हा अर्ज पुन्हा करण्याची विनंती (reapply for bail under Article 88 ) वाझे यांच्या वकिलांनी केल्यानंतर सत्र न्यायालयाने विनंती मंजूर (Mumbai Session court accepted Sachin Vaze application) करत अर्ज पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
सचिन वाझेंच्या वकिलाचा न्यायालयाला विनंती- ईडीने दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सचिन वाझे आरोपी क्रमांक एक आहे. मात्र अद्यापही वाझे यांना अटक करण्यात आली नसल्याने या प्रकरणांमध्ये कलम 88 अंतर्गत जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता. अर्जातील काही आणखी मुद्दे नव्याने दाखल करायचे असल्याने पुन्हा अर्ज दाखल करण्याची विनंती सचिन वाझे यांच्या वकिलांनी कोर्टासमोर केली होती. या अर्जावर निर्णय देत न्यायालयाने मंजूर केला आहे तसा पुन्हा अर्ज 15 नोव्हेंबर पर्यंत दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.