मुंबई : हरवलेल्या मुलांची वये १०, ७ आणि ५ अशी आहेत. ही तीन मुले बाहेर खेळत होती; मात्र अचानक गायब झाली (missing children in Christmas fair) असे दहिसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मल्हार थोरात यांनी सांगितले. (Mumbai Crime) त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेतला (Mumbai Police Found Missing Children) आणि शेवटी ती न सापडल्याने हरवल्याची तक्रार नोंदवली. (Surrender of missing children to their families) दहा वर्षांचा मुलगा अन्य मुलांना मेळ्यासाठी घेऊन गेला होता. (Latest news from Mumbai)
अखेर लागला शोध : 'आम्ही पाच पथके तयार केली व स्थानिकांच्यामदतीने व्हॉट्सअॅपद्वारे मुलांबद्दल हरवलेले असल्याबाबत संदेश त्वरित व्हायरल केला. त्याचप्रमाणे त्यांचे फोटो इतर पोलिस ठाण्यांना पाठवले, जेणेकरून ठावठिकाणा कळेल. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासल्यानंतर ती दहिसर स्टेशनच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना आढळले.
सीसीटीव्हीची मोलाची मदत : रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी तपासले असता मुले विरारच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याचे दिसत होती. त्यानंतर पोलिसांनी दहिसरच्या पलीकडे असलेल्या स्थानकांवर पोलीस पथके पाठवली आणि मुलांना शोधण्यासाठी त्या परिसराचे मॅन्युअली स्कॅनिंग सुरु केले. शुक्रवारी पहाटे त्यांना एका स्थानिकाकडून संदेश मिळाला की त्यांनी भाईंदर पश्चिम येथील मॅक्सिस मॉलजवळ मुले फिरताना पाहिली आहेत. तेव्हा अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तेथून मुलांना शोधून काढले आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सोपवले.