ETV Bharat / state

जेएनयू हल्ला : 'गेटवे'वरून आंदोलकांना आझाद मैदानात हलवले - mumbai protest

जेएनयूत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदवत रविवारी रात्रीपासून विद्यार्थ्यांचे 'गेटवे ऑफ इंडिया' येथे आंदोलन सुरू होते. या आंदोलनकर्त्यांना 'गेटवे ऑफ इंडिया'वरून आझाद मैदान येथे हलविण्यात आले आहे.

आंदोलकांना 'गेटवे ऑफ इंडिया'वरून आझाद मैदानात हलवले

author img

By

Published : Jan 7, 2020, 11:13 AM IST

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. मुंबईतही या हल्ल्याच्या निषेधार्थ 'गेटवे ऑफ इंडिया' येथे रविवारी रात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. यात सामान्य नागरिक आणि पर्यटकांना होणाऱ्या त्रासाचे कारण देत आंदोलकांना 'गेटवे ऑफ इंडिया'वरून आझाद मैदानात हलविण्यात आले आहे.

आंदोलकांना 'गेटवे ऑफ इंडिया'वरून आझाद मैदानात हलवले

देशाची राजधानी नवी दिल्लीत जेएनयू (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर रविवारी भ्याड हल्ला झाला. अभाविप या उजव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला. या हल्ल्याचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटले. या विरोधात मुंबईत 'गेटवे ऑफ इंडिया' येथे विद्यार्थ्यांचे रविवारी रात्री 12 वाजल्यापासून शांततेत आंदोलन सुरू होते. अनेक विद्यार्थी, नागरिक या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत होते. या आंदोलनकर्त्यांना आता गेटवे ऑफ इंडियावरून आझाद मैदानात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा - जेएनयू हल्ला प्रकरण : आंदोलनकर्त्यांना गेट वे ऑफ इंडिया येथून हटवले

गेटवे ऑफ इंडियाजवळ ताजमहाल हॉटेल ही एक ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे आम्ही आंदोलकांना अन्य ठिकाणी आंदोलन करा, अशी विनंती केली होती. परंतु, आंदोलक त्या ठिकाणीच आंदोलन करत होते. त्यामुळे त्यांना आम्ही आझाद मैदानात स्थलांतरीत केले आहे. तर, कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेण्यात आलेले नाही, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - 'जेएनयू' हल्ल्याच्या निषेधार्थ आजही मुंबईत आंदोलन सुरू

Intro:मुंबई : देशाची राजधानी नवी दिल्लीत जेएनयू(जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर जेएनयूत रविवारी भ्याड हल्ला झाला होता. अभाविप या उजव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला. हल्ल्याचे पडसाद मुंबईत उमटले. या विरोधात मुंबईत गेट वे आॅफ इंडिया येथे विद्यार्थ्यांचं रविवारी रात्री 12 वाजल्यापासून
शांततेत आंदोलन सुरू होते. अनेक विद्यार्थी या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत होते. या विद्यार्थ्यांना आता गेट वे ऑफ इंडिया वरून आझाद मैदानात हलवण्यात आले आहे. Body:गेटवे ऑफ इंडिया जवळ ताज महाल हॉटेल ही एक ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे आम्ही आंदोलकांना अन्य ठिकाणी आंदोलन करा अशी विनंती केली होती. परंतु आंदोलक त्या ठिकाणीच आंदोलन करत होते. त्यांना आम्ही आझाद मैदानात स्थलांतरीत केलं आहे. कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेण्यात आलेले नाही असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नोट
विद्यार्थी प्रसार माध्यमाशी बोलण्यास तयार नाही आहे. आम्ही पुढच्या दिशेबाबत चर्चा करत आहोत नंतर बोलू असे सांगण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.