मुंबई - भीम आर्मीचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांची २१ फेब्रुवारीला मुंबईत सभा होणार होती. मात्र, या सभेला कायदा सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या विरोधात भीम आर्मीचे कार्यकर्ते मुंबई हायकोर्टात दाद मागणार आहेत.
सीएए व एनआरसी विरोधात भीम आर्मीचे प्रमुख अॅड चंद्रशेखर आझाद हे सध्या देशभरात सभा घेत आहेत. यादरम्यान ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरही येणार आहेत. २१ फेब्रुवारी मुंबई, २२ फेब्रुवारी नागपूर आणि २३ फेब्रुवारी औरंगाबाद असा त्यांचा दौरा असणार आहे. मात्र, आता त्यांच्या या दौऱ्याबाबत सांशकता निर्माण झाली असून आझाद यांच्या भाषणामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे कारण देत पोलीस त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याचे नाकारले आहे.
हेही वाचा - 'आॅनलाईन सेक्स रॅकेट' चालविणाऱ्या दोघांना अटक, 2 महिलांची सुटका
आधी नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आता मुंबई पोलिसांनी ही परवानगी नाकारली. आज तसे पत्र मुंबई पोलिसांनी भीम आर्मीचे राज्याचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना दिले आहे. तर, या विरोधात आम्ही आवाज उठवू असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - हिंमत असेल तर लोकसभेची फेर निवडणूक घ्या, फडणवीसांना प्रति आव्हान