ETV Bharat / state

Threats to Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ टार्गेटवर; मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन - terror attack like 26 November

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह योगी आदित्यनाथ यांची हत्या करणार असल्याचा धमकीचा फोन शहर वाहतूक शाखेला करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या आरोपीने 26/11 सारखा हल्ला करण्याचेही स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

Threats to Pm Narendra Modi
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 18, 2023, 11:10 AM IST

Updated : Jul 18, 2023, 12:01 PM IST

मुंबई : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देणारा कॉल आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. मुंबई शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेत हा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे टार्गेटवर असल्याचे उघड झाले आहे. अज्ञात कॉलरने 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी देत मुंबईत बॉम्ब आणि एके 47 बंदूक पाठवल्याचेही या धमकीत नमूद केल्याची माहिती मुंबई शहर पोलीस वाहतूक दलातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

  • Maharashtra | Mumbai's traffic control room receives threat message, threatening that UP CM Yogi Adityanath & PM Modi govt are on target. The accused also threatened to be ready for a 26/11 like terrorist attack. A case under section 509 (2) of the IPC has been registered against…

    — ANI (@ANI) July 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात कॉलरने धमकीचा कॉल करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची हत्या करणार असल्याचा दावा केला आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत. या धमकीच्या फोन प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केल्याची माहिती शहर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवल्यास हल्ला : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला 12 जुलैला अज्ञात कॉलरने धमकीचा कॉल केला होता. पाकिस्तानी महिला सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवल्यास 26/11 सारखा दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करत आहे. मात्र त्यानंतर पुन्हा वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षास आज धमकीचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे.

फोननंतर मुंबई पोलीस सतर्क : मुंबई पोलिसांना बुधवारी 12 जुलैला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. पाकिस्तानी महिला सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात न पाठवले तर 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे दिली होती. त्या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून याविषयी त्यांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र आज पुन्हा शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत धमकीचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे.

दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब : दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवला आहे, अशी खोटी माहिती देऊन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करून अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. कदम वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जयश्री हॉटेल परिसरातून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे आणि मुंबईत असे धमकीचे कॉल येण्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती शहर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

Last Updated : Jul 18, 2023, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.