मुंबई : वारंवार मुंबई पोलिसांना येणारे धमकीचे कॉल, मेसेज यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यांच्या 1 ते 15 तारखेपर्यंत नवे आदेश जारी ( Prohibitory orders in Mumbai ) केले आहेत. पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 अंतर्गत मुंबईत 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या 15 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश ( Prohibitory orders in Mumbai ) जारी केले आहेत. मुंबईत महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ अन्वये प्रतिबंधात्मक आदेशानुसार, एका ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत ( Demonstration in Mumbai ) नाहीत.
मुंबई पोलिसांच्या सूचना - मायानगरी मुंबई शहरातील शांतता, कायदा, सुव्यवस्था, दंगल, मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जमावबंदीसह मुंबई पोलिसांनी ( Demonstration in Mumbai ) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हा आदेश 1 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 15 नोव्हेंबर 2022 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. हा आदेश 15 दिवसांसाठी आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश जारी - नोव्हेंबर महिन्याच्या 15 दिवसांत नेमक्या कोणत्या घडू शकतात याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केलेला नाही. मात्र, विविध तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा नवा आदेश कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जारी करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या 15 दिवसांमध्ये कोणत्याही सभा आणि मेळाव्यात लाऊडस्पीकर, डीजे, वाद्ये वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पोलिसांच्या परवानगी किंवा योग्य परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे शस्त्र, तलवार किंवा प्राणघातक शस्त्र बाळगल्यास कारवाईचा आदेश देण्यात आले आहेत. या आदेशातूनलग्न समारंभ किंवा विवाह संबंधित कार्यक्रम, अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी लोकांची गर्दी, चित्रपटगृह, थिएटर किंवा खुल्या उद्यानात नाट्य संमेलन, नियमानुसार खाजगी कंपनी, सहकारी संस्था यांसारख्या संस्थांची बैठक, सामाजिक बैठक, क्लब, सोसायटीच्या बैठकीत नियमांनुसार सर्वसाधारण सभा, शासनाचे कार्यक्रम, स्थानिक स्वराज संस्था शाळा, महाविद्यालय, सामान्य व्यवसाय कार्यक्रम किंवा अधिवेशन हे वगळ्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या कार्यक्रमांना पोलीस आयुक्त किंवा पोलीस विभागाकडून कार्यक्रम मिळाले आहेत त्या कार्यक्रमांना परवानगी असणार आहे.