ETV Bharat / state

Mumbai Police Against Narcotics : मुंबई पोलिसांनी ड्रग्जविरोधात कंबर कसली, कारवायांमुळे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त - Mumbai Police Against Narcotics

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti narcotics squad) गेल्या काही महिन्यांपासून ड्रग तस्करांविरोधात (action against drug traffickers) कंबर कसली आहे. एमडी या ड्रग्जची आतापर्यंतची मोठी जप्ती आणि भारतातील सर्वांत मोठ्या सप्लायरला ऑगस्टमध्ये मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्याने अंमली पदार्थाच्या तस्करांचे (drug smuggler) मोठे रॅकेट उध्वस्त झाले आहे. (Mumbai Police Against Narcotics) , Latest news from Mumbai, Mumbai crime

Mumbai Police Against Narcotics
ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त
author img

By

Published : Nov 30, 2022, 10:33 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti narcotics squad) गेल्या काही महिन्यांपासून ड्रग तस्करांविरोधात (action against drug traffickers) कंबर कसली आहे. या पथकाने कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याने ड्रग्ज तस्करांचे (drug smuggler) धाबे दणाणले (Mumbai Police Against Narcotics) आहेत. Latest news from Mumbai, Mumbai crime

पोलीस कारवाईमुळे ड्रग्जच्या किमतीत पाचपट वाढ : अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीला काही प्रमाणात का होईना मुंबईत खीळ बसल्याचे चित्र दिसत आहे. एमडीसारख्या महागड्या ड्रग्जची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. सध्या मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेफेड्रोन म्हणजेच एमडी उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या ड्रग्स बाजारात फारसे येत नसल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली. मात्र, मागणी कमी झाली नसल्याने ड्रग्जची किंमत पाच पटींनी वाढली आहे. एमडी या ड्रग्जची आतापर्यंतची मोठी जप्ती आणि भारतातील सर्वांत मोठ्या सप्लायरला ऑगस्टमध्ये मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्याने अंमली पदार्थाच्या तस्करांचे मोठे रॅकेट उध्वस्त झाले आहे.

परदेशी नागरिकांसह 50 कोटींचे हेरॉईन जप्त : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आगस्टमध्ये 4800 कोटींचे 2400 किलो मेफेड्रोन जप्त करून आठ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. तर एनसीबीने गुजरात आणि मुंबईतून 120 कोटींचे अंदाजे 60 किलो मेफेड्रोन जप्त केले. त्याचप्रमाणे डीआरआयने देखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी नागरिकांसह 50 कोटींचे हेरॉईन जप्त केले.

ह्या वर्षी आतापर्यंतचे सर्वांत मोठे छापे : १३ ऑगस्टला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने गुजरात येथील अंकलेश्वरमध्ये एका छोट्या कारखान्यावर छापा टाकला आणि 513 किलो एमडी पदार्थ जप्त केला. कारखान्याच्या मालकाला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

6 ऑक्टोबरला नाव्हाशिवाय बंदरावर डीआरआयने दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला हिरवी सफरचंद असलेला कंटेनर अडवला आणि त्याची तपासणी केली असता हिरव्या सफरचंदांच्या बॉक्समध्ये कोकेनच्या प्रत्येकी अंदाजे एक किलो वजनाच्या मोठा विटा लपवल्याचे उघडकीस आले. या कारवाईदरम्यान ५०.२३ किलो वजनाच्या आणि 502 कोटी रुपयांच्या 49 विटा जप्त करण्यात आल्या.

7 ऑक्टोबरला एनसीबीच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत मुंबई आणि गुजरात मधून 120 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 60 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत एनसीबीने एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना कट केली होती.

11 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने ३५ कोटी रुपयांच्या ४.९८ किलो हेरॉईन सह एका प्रवाशाला अटक केली. त्याच्या ट्रॉली बॅगमधून ४.९८ किलो हेरॉईन जप्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.