मुंबई - होळीच्या सणाचा बे रंग होवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात विशेष 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह' मोहीम राबली होती. यात मुंबईतील 4 हजार 612 वाहनचालकांवर कारवाई केली गेली. यात भरधाव वेगाने गाडी चालवणारे १ हजार 285, 286 ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट 2 हजार 656 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 336 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर
दरम्यान, मुंबई शहरात नागरिकांना होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करता यावा, म्हणून मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई शहरात धुलीवंदनाच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात जागो-जागी नाकाबंदी केली होती. महिलांच्या बाबतीत होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकारांवर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील विशेष पथक नेमण्यात आले होते.