ETV Bharat / state

मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 5,776 जणांवर पोलिसांची कारवाई - मुंबई टाळेबंदी गुन्हे न्यूज

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहे. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला गेला आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा सरकारचा नियमसुद्धा आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Aug 14, 2020, 8:28 PM IST

मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. असे असले तरी मास्कचा वापर करण्याबाबत सार्वजनिक ठिकाणी उदासीनता दिसून येते. मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 5,776 जणांवर कारवाई केली आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीयस्तरावर केल्या जात आहे. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला गेला आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा सरकारचा नियमसुद्धा आहे. तरीही बरेच जण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबई शहरात विविध ठिकाणी टाळेबंदीची 20 हजार 97 प्रकरणे आढळून आली आहेत. यामधील 46 हजार 564 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 8064 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 17822 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 20678 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.

लॉकडाऊनमध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1858 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत 2618 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तर पूर्व मुंबई तब्बल 3237 गुन्हे दाखल झाले आहेत. तर पश्चिम मुंबईत 3392,उत्तर मुंबईत 8992 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात , विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.