मुंबई : शहर पोलिसांना 24 जूनच्या सायंकाळी मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या भामट्याला उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून उचलले आहे. दरवेश राजभर असे पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या भामट्याचे नाव आहे. बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा भामटा पोलिंसाच्या हाती लागला असला, तरी त्याचे कर्तेकरविते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा : मुंबई पोलीस दलाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर 22 आणि 23 जूनच्या सकाळी मेसेज पाठवून अंधेरी कुर्ला परिसरात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेत अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 278/23 u/s 505 (1)(B),505(2),185 IPC नुसार नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दरवेश राजभर याचा माग काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.
बॉम्बस्फोट करण्यासाठी मिळाले दोन कोटी : मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्याऱ्या दरवेश राजभरने आपल्याला स्फोट घडवून आणण्यासाठी दोन कोटी मिळाल्याची मेसेजमध्ये नोंद केली होती. इतकेच नाही, तर तुम्ही जर दोन लाख रुपये दिले, तर हे बॉम्बस्फोट टाळता येतील आणि मी माझ्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असेही नमूद केले होते. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. मात्र हा फेक कॉल असू शकतो अशी धारणाही मुंबई पोलिसांची झाली होती. तरीही पोलीस कोणताही धोका पत्करायला तयार होत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास करत दरवेश राजभरच्या जौनपूरमधून मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा -