ETV Bharat / state

Mumbai Crime News : खंडणीसाठी केले हॉटेल मालकाचे अपहरण, पोलिसांनी 12 तासांत ठोकल्या बेड्या!

खंडणीच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या हॉटेल मालकाची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे.

Mumbai Crime News
मुंबई क्राइम
author img

By

Published : Apr 25, 2023, 5:57 PM IST

महेश्वर रेड्डी, डीसीपी

मुंबई : अपहृत हॉटेल मालकाची 12 तासातच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी हॉटेल मालकाचे खंडणीच्या उद्देशाने अपहरण केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अनुप शेट्टी (45 वर्षे) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून पोलिसांनी त्यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केली आहे.

बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले : सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 ते 5 इसमांनी अंधेरी पूर्व येथे असलेल्या हॉटेल दिरा रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलच्या मालकास बंदुकीचा धाक दाखवून त्याची बॅग खेचुन घेतली. नंतर हॉटेल मालकास ताब्यात घेवून त्यांनी हॉटेलच्या बाहेर दोन वेळा फायरिंग केली. त्यानंतर त्या इसमांनी हॉटेल मालकाला इनोव्हा गाडीमध्ये जबरदस्तीने बसवुन त्याचे अपहरण केले. ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती : घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार महावीर कुमार मनी यादव (26 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस पथके तयार करून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीनुसार अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विविध पथकांना रवाना करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी अपहरण झालेल्या व्यक्तीकडे त्याच्या मित्रांमार्फत 50 लाख रूपये खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी स्वप्नील अकरकर आणि वैभव जानकर यांना रेतीबंदर, ठाणे येथुन ताब्यात घेतले आहे.

आरोपींना अटक : आरोपी विजय अवकिरकर व चंद्रकांत अवकिरकर यांना अपहरण करण्यात आलेल्या वाहनासह अटक केली गेली आहे. त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल, दोन चाकू व फिर्यादी यांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस पथकाने सदर घटनेमध्ये सहभाग असलेले इतर तीन आरोपी सागर गांगुर्डे, मनोज लोखंडे व गुरुनाथ वाघे यांना अडवली, शहापुर ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : Illegal Liquor Stock : सांगितली औषधे अन् निघाला मद्यसाठा; ट्रकमधून 57 लाखांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.