ETV Bharat / state

कर्जाच्या नावाखाली व्यावसायिकांची लूट, 5 जणांना अटक

गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मुंबईसह इतर राज्यातील व्यापाऱ्यांना व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गाठत होती. यानंतर त्यांना सोशल माध्यमांद्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात अधिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत होती

व्यावसायिकांची लूट करणाऱ्या 5 जणांना अटक
व्यावसायिकांची लूट करणाऱ्या 5 जणांना अटक
author img

By

Published : Dec 4, 2019, 3:08 PM IST

मुंबई - करोडो रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदार व व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात व राज्याबाहेर कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या टोळीविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली.

गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मुंबईसह इतर राज्यातील व्यापाऱ्यांना व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गाठत होती. यानंतर त्यांना सोशल माध्यमांद्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात अधिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत होती. यासाठी हे आरोपी वर्तमानपत्र, सोशल मीडिया , व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांचा वापर करून स्वतःची जाहिरात करत होते.

कर्ज मिळवण्यासाठी एखाद्या गरजूने यांना संपर्क केला, की त्याला करोडो रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे सांगत या टोळीतील काहीजण बनावट बँकेचे अधिकारी म्हणून समोर येत होते. पुढे त्यासाठी एखादी संपत्ती किंवा घर बँकेकडे गहाण ठेवावे लागेल, व त्यासाठी करारनामा बनवून , रजिस्ट्रेशन करावे लागेल असे ते संबंधितांना सांगत.

अकबर पठाण , डीसीपी , गुन्हे शाखा

समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसावा म्हणून बनावट कराराची कागदपत्र, बनावट चेक व डीडी बनवून ते समोरच्या व्यक्तीकडून लाखो रुपये रजिस्ट्रेशनच्या नावाखाली घेत होते. मात्र, पैसे मिळताच ही पाच जणांची टोळी जागेवरून पोबारा करत होती. याप्रकरणी पोलिसांनी शोएब चांदीवाला, रफिक बाबुमिया शेख , किरण किशोर , विजय ग्रोवर , रवींद्र बाबूराव कालात या आरोपींना अटक केली आहे.

Intro:मुंबईसह राज्यात व राज्याबाहेर कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचं कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याखाली गुंतवणूकदार व व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मुंबई सह इतर राज्यातील व्यापारांना व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गाठून त्यांना सोशल माध्यमांच्या द्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात मोठ्यात मोठा लोन मिळून देण्याचा आमिष दाखवत होती.
Body:यासाठी हे आरोपी वर्तमानपत्र , सोशल मीडिया , व्हाट्सअप सारख्या माध्यमांचा वापर करून स्वतःची जाहिरात करत होते. कर्ज मिळवण्यासाठी एखाद्या गरजू पीडितने यांना संपर्क केला असता, त्याला करोडो रुपयांचा कर्जत कमीत कमी कागदपत्रांमध्ये मिळवून देऊ अशी हमी ही टोळी देत होती. यासाठी या टोळीतील काही जण बनावट बँकेचे अधिकारी म्हणून समोर येत होते . करोडो रुपयांचे कर्ज हवे असेल तर त्यासाठी एखादी संपत्ती किंवा घर हे बँकेकडे गहाण ठेवावे लागेल , व त्यासाठी करारनामा बनवून , रजिस्ट्रेशन करावा लागेल अस पीडिताला सांगितलं जात होतं. पीडित व्यक्तीचा विश्वास बसावा म्हणून बनावट कराराची कागदपत्र , बनावट चेक व डीडी बनवून पीडित व्यक्तीकडून लाखो रुपये रजिस्ट्रेशनच्या नावाखाली घेतले जात होते. मात्र पैसे मिळतात ही पाच जणांची टोळी जागेवरून पोबारा करत होती. याप्रकरणी पोलिसांनी शोएब चांदीवाला , रफिक बाबुमिया शेख , किरण किशोर , विजय ग्रोवर , रवींद्र बाबूराव कालात या आरोपीना अटक केली आहे.

Conclusion:( बाईट - अकबर पठाण , डीसीपी , गुन्हे शाखा )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.