ETV Bharat / state

Mumbai Crime : वृद्धाचे 22 लाख लुटलेले तीन आरोपी अटकेत, 19 लाख रुपये हस्तगत - प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ

मुंबईत मागील काही दिवसांपासून प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडील मेट्रोस्थानकाजवळ एका वृद्ध नागरिकाला चोरट्यांनी लुटले. कार्यालयातील बावीस लाख रुपये रक्कम घरी घेऊन जाताना ही घटना घडली होती.

mumbai crime
वृद्धाचे 22 लाख लुटलेले तीन आरोपी अटकेत, 19 लाख रुपये हस्तगत
author img

By

Published : Feb 8, 2023, 2:00 PM IST

वृद्धाचे 22 लाख लुटलेले तीन आरोपी अटकेत, 19 लाख रुपये हस्तगत

मुंबई : मुंबई परिसरात लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली. या आरोपींकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी 19 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदकुमार कांबळी (३०), सनी शशिकांत सुर्वे (२८) आणि अभिषेक जयस्वाल (३० वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

61 वर्षीय वृद्धाला लुटले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील मोगरा मेट्रो स्थानकाजवळ 61 वर्षीय एक वृद्ध आपल्या कार्यालयातून घराकडे रिक्षाने जात होता. वाहतूक कोंडीचा फायदा घेत आरोपींनी त्या वृद्ध व्यक्तीकडील बावीस लाख 19 हजार 600 इतकी रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. आणि पळ काढला. वृद्ध व्यक्ती आणि रिक्षा चालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शस्त्र काढल्यामुळे दोघेही घाबरले. त्यामुळे आरोपी रोख रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाला. याविषयीची तक्रार फिर्यादीने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दिली या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कलम ३९२ भादवि अन्वये नोंद करून तपासात सुरुवात केली.

हेल्मेटचा वापर : जोगेश्वरी पोलिसांनी अधिकारी व अंमलदार यांचा समावेश असलेली वेगवेगळी पथके तयार केली. त्यांच्या मदतीने तपास सुरू केला. मात्र आरोपींनी आपली ओळख लपावी यासाठी बनावट नंबर प्लेट असलेल्या गाड्यांचा वापर केला होता. तसेच हेल्मेट वापरले. यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास तपास पथकाला अडचण आली. परंतु पथकाने फिर्यादीचे कार्यालय, प्रवास केलेला मार्ग तसेच घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिर्यादींच्या कार्यालयातील एक व्यक्ती आणि मालवणी परिसरातून एक व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आर्थिक निकड असल्याने कबुली त्यांनी दिली. तिघाही आरोपींना अटक करून न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : Mumbai ACB Action: मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने मागितली तब्बल ९ लाखांची लाच.. एसीबीने ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.