ETV Bharat / state

Mumbai Crime : फिर्यादीच निघाला आरोपी, बोगस पोलिसांकडून 45 लाखांच्या चोरीचा रचला बनाव - घर खरेदीचे पैसे चोरीला

आग्रीपाडा पोलीस ठाण्याने एका अशा गुन्ह्याची उकल केली आहे की, ज्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार हाच आरोपी निघाला आहे. याप्रकरणी 22 फेब्रुवारीला भारतीय दंड विधान कलम 170, 341, 392 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अमीर मोहम्मद व्होरा, वय ३० वर्षे हाच फिर्यादी असून हीच व्यक्ती आरोपी देखील आहे. अमीर मोहम्मद व्होरा याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करतो.

Mumbai Crime
फिर्यादीत निघाला आरोपी
author img

By

Published : Feb 25, 2023, 7:01 AM IST

मुंबई : मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे वास्तव्यास असलेले आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असलेले अमीर मोहम्मद व्होरा, 22 फेब्रुवारीला तक्रार केली की, ते त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्या गाडीने भुलेश्वर येथून त्यांच्या घरी परतत होते. तेव्हा साडेसात वाजताच्या सुमारास भायखळा पश्चिम येथील ना. म जोशी मार्गावर असलेल्या मॉन्टे साउथ इमारतीच्यासमोर दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी केली. गाडी थांबवली व त्याचा मोटार वाहन चालक परवाना तपासत असताना, दुसऱ्या मोटार सायकलवरून आलेल्या त्यांच्या इतर दोन साथीदारांनी त्यांच्या गाडीमध्ये ठेवलेले ४४ लाख ०८ हजार रूपयांची रक्कम पळवून नेली.

घर खरेदीचे पैसे चोरीला : या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी करता त्याने असे सांगितले की, त्याच्या सासूने ती रक्कम दुबई येथून मुंबईला पाठवली होती. ती रक्कम त्याला फ्लॅट घेण्याकरीता तिने पाठवली होती. परंतु साडेसात वाजताच्या सुमारास त्याला पोलीस असल्याची बतावणी करून चार इसमांनी संगणमत करून त्याच्याकडून ती रक्कम जबरीने चोरून नेली.

खोटा बनाव रचला : सदर इसमाने घटना घडल्यानंतर त्या चोरांचा पाठलाग केला. त्यामुळे तक्रार करण्यासाठी येण्यास विलंब झाला असल्याचे त्याने सांगितले. याबाबत, आग्रीपाडा पोलीस ठाणे यांनी त्याच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत गु.र.क्र.१२/२०२३ कलम ३९२ १७०, ३४१, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेची दखल घेत पोलीस सह आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) सत्यनाराण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- ३ अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ-३ च्या सहाही पोलीस ठाण्यांची पथके तयार करण्यात आली. त्यांच्यामार्फत तपास सुरू करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तांत्रिक तपास केला. खबरींच्या मार्फत आरोपींची माहिती मिळवण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा अवलंब केला.

सीसीटीव्ही फुटेजने घटनेचा उलगडा : तपासादरम्यान फिर्यादी आणि त्याचे वडिल मोहम्मद हनिफ गनी व्होरा, वय ५७ वर्षे यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली. फिर्यादींनी तक्रार करण्याकरीता केलेला विलंब आणि त्यांच्यामधील विसंगतीने पोलीसांचा फिर्यादीवरील संशय वाढला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर पोलीसांना खात्री झाली की, फिर्यादी देत असलेली माहिती खोटी आहे. पोलीसांनी फिर्यादींकडे सातत्यपूर्ण आणि सखोल तपास करून फिर्यादीने दिलेल्या माहितीमधील तफावत पुराव्यासह फिर्यादीला दाखवून दिल्यानंतर फिर्यादीने अखेर गुन्हा कबूल केला. पोलीसांनी या गुन्हयामध्ये त्यास अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्हयात लपवून ठेवलेले ४४ लाख आठ हजार रोख रक्कम हस्तगत केले आहेत. अशाप्रकारे जबरी चोरीचा बनाव केलेला गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाणे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीस २४ तासांच्या आत अटक केली.

हेही वाचा : Pune Crime: क्लासेसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.