ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करावर कारवाई; आतापर्यंत १५ कोटींचे कोकेन जप्त - deputy police commissioner shivdip lande

दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशाचा नागरिक असलेल्या आणि नवी मुंबईत राहणाऱ्या बोनाव्हेचुर एंझुबेछुकु एनऊडे (३५) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 6 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करावर कारवाई
author img

By

Published : Jul 18, 2019, 8:57 PM IST

मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई शहरातील अमली पदार्थ तस्करावर धडक कारवाई केली आहे. यावर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत केलेल्या कारवाईत, आतापर्यंत तब्बल १५ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशाचा नागरिक असलेल्या आणि नवी मुंबईत राहणाऱ्या बोनाव्हेचुर एंझुबेछुकु एनऊडे (३५) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 6 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करावर कारवाई

अटक केलेल्या आरोपींची पोलिस चौकशी केली असता, आरोपी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. आफ्रिकेतून भारतात येणारे कोकेन सुरुवातीला दिल्लीमध्ये आणले जाते आणि त्यानंतर मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वितरीत करण्याचे काम हा आरोपी करत होता. याबरोबरच अमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या कारवाईमध्ये जॉन फ्रान्सिस व इजिके या दोन आफ्रिकन अमली पदार्थ तस्करांना अटक केली होती. त्यांच्याकडून ६ कोटी ३ लाखांचे कोकेन जप्त केले होते. तसेच २४ मे रोजी केलेल्या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने डेविड ओल आणि तुबुलाई या केनियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांचे कोकेन जप्त केलेले आहे. अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.

Intro:मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करी यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे जानेवारी 2019 ते जुलै 2019 पर्यंत केलेल्या कारवाईत , आतापर्यंत तब्बल 15 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशाचा नागरिक असलेल्या व नवी मुंबईत राहणाऱ्या बोनाव्हेचुर एंझुबेछुकु एनऊडे (35) या आरोपीला अटक केली आहे या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल सहा कोटी रुपयांचा खोके जप्त केला आहे

Body:अटक आरोपींची पोलिस चौकशी केली असता हा आरोपी आंतराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असून आफ्रिका देशांमधून भारतात येणारे कोकेण हे सुरुवातीला दिल्लीत येतं अशी कबुली या आरोपीने दिले आहे .दिल्लीत येणार कोकेन मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वितरित करण्याचे काम हा आरोपी करत होता याबरोबरच अमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी 2019 च्या महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये जॉन फ्रान्सिस व इजिके या दोन आफ्रिकन अमली पदार्थ तस्करांना अटक केली होती त्यांच्याकडून सहा कोटी तीन लाखांचे कोकेन जप्त केलं होतं. याबरोबरच 24 मे रोजी केलेल्या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने डेविड ओल व तुबुलाई या केनियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलेला आहे.

Conclusion:(बाईट - शिवदीप लांडे पोलीस उपायुक्त अमली पदार्थ विरोधी पथक)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.