ETV Bharat / state

Bullet train route : राज्यातील बुलेट ट्रेन मार्गाला गती देण्याचा पुढील टप्पा सुरू.. निविदा मागवल्या

राज्यातील बुलेट ट्रेन मार्गाला गती ( speeding up bullet train route ) देण्याचा पुढील टप्पा सुरू शिळफाटा ते झरोळी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील ( Gujarat Maharashtra border ) मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. बिकेसी ते शिळफाटा सोबत आता उक्तमार्गासाठी देखील निविदा मागवण्यात आल्या आहेत.

Bullet train route
बुलेट ट्रेन मार्गाला गती देण्याचा पुढील टप्पा सुरू
author img

By

Published : Nov 16, 2022, 11:03 AM IST

मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन ( Project Bullet Train ), मुंबई अहमदाबाद गती शक्ती ट्रेन मार्ग जलद पूर्ण होण्यासाठी केंद्र आग्रही आहे. त्यासाठी आता गुजरात महाराष्ट्र सीमेवर ( Gujarat Maharashtra border ) शिळफाटा ते झारोळी पर्यन्त 135 किमी अंतराच्या मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळच्यावतीने गेल्या वर्ष भरा पासून विविध कामांना गती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बांद्रा कुर्ला संकुल ते शिळफाटा भुयारी मार्गसाठी निविदा सुरू केल्या होत्या. आता गुजरात महाराष्ट्र सीमेवर शिळफाटा ते झारोळी पर्यन्त 135 किमी अंतराच्या मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

या आहेत निविदा सादर, खुली करण्याच्या तारखा : निविदा सादर करण्याची तारीख 14 मार्च 2023 आहे. तर निविदा खुली करण्याची तारीख 15 मार्च 2023 असेल. ठाणे विरार आणि बोईसर हे तीन रेल्वे स्थानक शिळफाटा ते झारोळी पर्यन्त असणार आहेत. हे अंतर 135 किमी आहे तर एकूण बुलेट ट्रेनसाठी रेल्वे मार्ग 156 किमी आहे. ह्या कामासाठी निविदा करीत एल अँड टी, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, अफकॅन्स इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, एमईआयएल एचसीसी कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

लवकरच धावणार मुंबई हैद्राबाद बुलेट ट्रेन : अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ आता मुंबईतून आणखी एक बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई- हैदराबाद या ७११ किलोमीटर मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून एनएचआरसीएलला NHRCL सादर करण्यात आले आहे. अशी माहिती एमएमआरडीएच्या MMRDA अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.