ETV Bharat / state

BMC ready to face Corona : कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज, आरोग्य विभागाची माहिती - Genome sequencing tests

मुंबई येथे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास किंवा त्यांना लक्षणे आढळून आल्यास, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेने रुग्णालय सज्ज ठेवली आहेत. तसेच गरज पडल्यास सायन चुनाभट्टी येथील कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात (Mumbai municipality is ready to face Corona) आले आहे. त्याचप्रमाणे पॉजिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome sequencing tests) केली जाणार आहे. पालिका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सज्ज असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या (Health Department Give Information) मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. BMC Health Department ready to face Corona

BMC ready to face Corona
कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज
author img

By

Published : Dec 26, 2022, 7:49 PM IST

मुंबई : जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीन, जपान, युनायटेड स्टेट्स, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स यासारख्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. तसेच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास किंवा त्यांना लक्षणे आढळून आल्यास, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेने (Mumbai municipality is ready to face Corona) रुग्णालय सज्ज ठेवली आहेत. तसेच गरज पडल्यास सायन चुनाभट्टी येथील कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पॉजिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome sequencing tests) केली जाणार आहे. पालिका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सज्ज असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या (Health Department Give Information) मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. BMC ready to face Corona

जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या : चीन, जपान, युनायटेड स्टेट्स, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत असल्याने, भारत सरकारने २० आणि २२ डिसेंबर रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानतळ अधिकारी आरटी-पीसीआर नमुने घेण्यासारखे उपाय पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी २ टक्के नमुने तसेच सर्व पॉजीटिव्ह नमुने एन आय व्ही (NIV) पुणे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील, असे आरोग्य विभागाने सांगितले.

रुग्णालयात इतक्या खाटा, सुविधा : पालिकेकडे कोविड-19 रुग्णांवर उपचार करणारी दोन रुग्णालये आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात १७०० तर, कस्तुरबा रुग्णालयात ३५ खाटा आहेत. चार सरकारी रुग्णालये आहेत. ज्यात कामा हॉस्पीटलमध्ये १००, सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये ७०, टाटा हॉस्पीटलमध्ये १६, जगजीवन राम हॉस्पीटलमध्ये १२ तसेच २६ खाजगी रुग्णालये आहेत ज्यात ८७१ खाटा उपलब्ध आहेत. या सर्व हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या वॉररूम द्वारे रुग्णांना दाखल केले जाणार आहे. वॉर्ड वॉररूम 24 x 7 कार्यरत आहेत, पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये, नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी संपर्क साधू शकतात. पालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि खासगी रुग्णालयाच्या खाटा कमी पडल्यास, सायन चुनाभट्टी येथील सोमय्या हॉस्पिटल जवळ असलेले कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. गरज पडल्यास या कोविड सेंटरचा वापर रुग्णांना क्वारंटाईन आणि उपचार करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा : रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन सुविधा म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलिंडर आणि या स्वरूपात उपलब्ध आहे. कोविड-19 प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी PSA टँक आहेत. COVID-19 चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी पालिका कठोरपणे लसीकरण मोहीमची अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

कोविड नियमांचे पालन करा : नागरिकांनी कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सर्व योग्य वर्तनाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. COVID-19 यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे समाविष्ट आहे, इतरांपासून शारीरिक अंतर राखणे, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आजारी असताना घरी राहणे. वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी लसीकरण आणि खबरदारीचा डोस घ्यावा. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून व्यक्ती स्वतःचे आणि त्यांच्या समुदायाचे संरक्षण करू शकतात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईत लस नाही : मुंबईमध्ये कोव्हीशील्ड, कोवॅक्सीन आणि कोर्बोवॅक्स या लस देण्यात आल्या. मुंबईमध्ये सध्या कोवॅक्सीन या लसीचे केवळ ६ हजार डोस बाकी आहेत. कोव्हीशील्ड आणि कोर्बोवॅक्स या लसीचा एकही डोस शिल्लक नाही. मुंबईत सध्या ४० ठिकाणी लसीकरण सुरु आहे. त्यातील ३६ पालिकेची आणि ४ राज्य सरकारची केंद्र आहेत. मुंबई पालिका आणि राज्य सरकारकडे लसीचे डोस नसले तरी, खासगी रुग्णालयात सर्व लसीचे डोस आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारला लस नसल्याचे कळविले असून, लसीची मागणी केली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईत ११ लाख ५५ हजार रुग्ण : मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या अडीच वर्षात ११ लाख ५५ हजार ९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १ लाख २१ हजार २९४ इतका नोंदवण्यात आलेला आहे. १८ ते २४ डिसेंबर या आठवड्यातील पॉजिटिव्हिटी रेट ०.०००५ टक्के इतका आहे. मुंबईमध्ये सध्या ४४४१ बेड्स असून, त्यापैकी ५ म्हणजेच ०.११ बेडवर रुग्ण दाखल आहेत.

रुग्णालयात इतक्या खाटा : मुंबई पालिकामध्ये सेव्हन हिल्स (१७०० बेड), कस्तुरबा (३५ बेड) आहेत. चार सरकारी रुग्णालयात कामा रुग्णालय (१००), सेंट जॉर्ज रुग्णालय (७०), टाटा रुग्णालय (१६), जगजीवन राम रुग्णालय (१२), तर २६ खासगी रुग्णालयात (८७१) बेड उपलब्ध आहेत. BMC ready to face Corona

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.