ETV Bharat / state

आता पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा, आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी - vacation

या परिपत्रकानुसार ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वी दुसरा आणि चौथा आठवडा सुट्टीचा फायदा मिळत होता, अशाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. रोटेशन पद्धतीने सुट्टी देणाऱ्या कार्यालयांचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी खाते प्रमुख, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात याव्यात, असे या पत्रकात म्हटले आहे.

bmc
आता पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा, आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी
author img

By

Published : Mar 4, 2020, 1:29 PM IST

मुंबई - राज्य सरकारच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. या बाबतचे परिपत्रक पालिकेच्या कामगार विभागाने प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. पालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर हा निर्णय अंमलात येणार आहे.

mumbai
परिपत्रक
mumbai
परिपत्रक

या परिपत्रकानुसार ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वी दुसरा आणि चौथा आठवडा सुट्टीचा फायदा मिळत होता, अशाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे शनिवार आणि रविवार या दिवशी पालिकेचे मुख्यालय आणि इतर प्रशासकीय कार्यालये बंद राहणार आहे. रोटेशन पद्धतीने सुट्टी देणाऱ्या कार्यालयांचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी खाते प्रमुख, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात याव्यात, असे या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - महिला दिन विशेष : जाणून घ्या फुटबॉलची 'दुर्गा' ओयनुम बेंबीम देवी यांच्याविषयी...

5 दिवसांच्या आठवड्याची मागणी राज्य सरकारी, निमशासकीय तसेच महापालिका कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. या मागणीनुसार राज्य सरकारने 24 फेब्रुवारीला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. याची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

हेही वाचा - औषधांचा परवडणाऱ्या दरात पुरेसा पुरवठा करा; केंद्राचे राज्यांना निर्देश

कामाच्या वेळा बदलणार

5 दिवसांचा आठवडा लागू झाल्याने पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 पर्यंत काम करावे लागणार आहे. पालिकेत 'ड' वर्गात काम करणाऱ्या शिपाई, हमाल, कामगारांना सकाळी 9.30 ते 6.30 पर्यंत काम करावे लागणार आहे. दुपारी 1 ते 2 या वेळेत केवळ अर्धा तास जेवणाची सुट्टी मिळणार आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ 8 नैमित्तिक रजा मिळणार आहेत. या रजा इतर रजांना मिळून घेता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.