ETV Bharat / state

Mumbai Municipal Corporation: कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिकेकडे 'या' आहेत सोयीसुविधा - कोविड रुग्णसंख्येत वाढ

Mumbai Municipal Corporation: जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने (Covid19) भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सुचनांनुसार, पूर्वतयारीची खातरजमा करावयाची आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation) आरोग्य प्रशासनाने (Health Department) पूर्वतयारी केली आहे.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Dec 31, 2022, 12:16 PM IST

मुंबई: चायना, जापान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राजील आणि फ्रान्स आदी देशांमध्ये कोविड-१९ च्या (Covid19) रुग्ण संख्येत अचानक झालेली वाढ पाहता भारत सरकारने २० व २२ डिसेंबर या दिवशी अद्ययावत सूचना प्रसारित केले आहेत. यानुसार पूर्वतयारीची खातरजमा (मॉकड्रिल) केली जाणार आहे. या अनुषंगाने पालिकेने उपलब्ध खाटा, ऑक्सिजन, कर्मचारी, लागणारी उपकरणे यांची तपासणी केली असून त्याची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर (Central Govt of Portal ) अपलोड केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिली.

पायाभूत सुविधांनी सुसज्ज: जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सुचनांनुसार, पूर्वतयारीची खातरजमा करावयाची आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. याचे उद्दिष्ट कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यास रुग्णालयांची पूर्वतयारी आहे का ? याबाबत तपासणी करणे, जर कोविड-१९ ची रुग्णसंख्या वाढत असेल, तर कोविड-१९ च्या उपचारांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांनी सुसज्ज होवून, आवश्यक ती पूर्वतयारी करून बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

रुग्णांसाठी असलेल्या खाटा: कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेचे १०, शासकीय ३ व २१ खासगी रुग्णालय कार्यरत आहेत. विलगीकरण करण्यासाठी २१२४ खाटा असून त्यापैकी १५२३ खाटा कार्यशील आहेत. ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १६१३ खाटा असून त्यापैकी १०२१ कार्यशील आहेत. अतिदक्षता विभागात ५७९ खाटा असून ४७३ कार्यशील आहेत. व्हेंटिलेटर १०४९ असून त्यापैकी ९५४ कार्यशील आहेत.

पुरेसे डॉक्टर, कर्मचारी: पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. पालिकेच्या सेवेत डॉक्टर ३२४५ आहेत. त्यापैकी २८२८ डॉक्टर कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले आहेत. परिचारिका ५७८४ असून त्यापैकी ४०२९ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेल्या परिचारिका आहेत. निमवैद्यकीय कर्मचारी ३४५३ असून ३२४६ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले कर्मचारी आहेत.

पुरेश्या रुग्णवाहिका: रुग्णांची वाहतूक करण्यासाठी BLS रुग्णवाहिका ४६ आहेत, त्यापैकी ३५ कार्यशील आहेत. ALS रुग्णवाहिका- २५ आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारी असलेल्या, गैर शासकीय संस्थांमार्फत पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिका २१ असून त्यापैकी १८ कार्यशील आहेत. १०८ च्या रुग्णवाहिका ९६ आहेत.

औषधे आणि ऑक्सिजन: कोविड-१९ रुग्णांचे निदान आणि मागोवा घेण्यासाठी दैनिक चाचणी क्षमता १३५०३५ आहे. ३४ रुग्णालये, ४९ प्रयोगशाळा यामध्ये या चाचण्या केल्या जातात. कोविडसाठी विशिष्ट औषधे आणि उपचार प्रोटोकॉलनुसार रेमडीसीवीर, टॉसीलोझुम्याब, मिथाईलप्रेडनिसोलोन, डेक्सामेथाझोन, अँफोटेरीसिन बी, पॉस्कोनयाझोल इत्यादींचा साठा उपलब्ध आहे. भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास ती खरेदी केली जाईल, आणि उपलब्ध करून दिली जातील. आवश्यक उपकरणे आणि संसाधनांचा पुरवठा आहे. पुरेशा प्रमाणात पीपीई किट, एन-९५ मास्क, नेब्युलायझर, पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ८५९ आहेत. ऑक्सिजन सिलेंडर २३९९ असून त्यामधून २०३६ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा आहे. PSA प्लांट ७९ आहेत, त्यामध्यमातून १४६८ मेट्रिक टन, लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन २६८ मेट्रिक टन उपलब्ध आहे.

वॉररूम्सद्वारे रुग्णांना दाखल केले जाणार: पालिकेच्या सर्व २४ विभागातील २४ तास चालू असणाऱ्या वॉररूम्सद्वारे कोविडच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याकरिता मदत केली जाईल. हा उपक्रम कोविडचा उद्रेक झाल्यास रुग्णालयांची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे, आणि त्यानुसार सर्व अहवाल एकत्रित केले जात आहे. उद्या शासकीय पोर्टलवर अपलोड केले जातील, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.