ETV Bharat / state

अबब! मुंबई महापालिकेकडून एक खड्डा बुजवायला १७ हजारांचा खर्च

author img

By

Published : Aug 17, 2019, 12:00 AM IST

मुंबई महापालिकेने २०१७-१९ या दोन वर्षात ८ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खर्च पाहता पालिकेने एक खड्डा बुजवायला तब्बल १७ हजार रुपये खर्च केला असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेकडून एक खड्डा बुजवायला १७ हजारांचा खर्च

मुंबई - महापालिकेने २०१७-१९ या दोन वर्षात ८ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खर्च पाहता पालिकेने एक खड्डा बुजवायला तब्बल १७ हजार रुपये खर्च केला असल्याचे समजते. शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकाराचा वापर करून ही माहिती मिळवली.

मुंबई महापालिकेकडून एक खड्डा बुजवायला १७ हजारांचा खर्च

रस्ते बांधकामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. २०१३ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या एकूण २४१४६ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २३३८८ खड्डे भरल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच २०१३ ते २०१९ या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठीच्या एकूण तरतूद निधीपैकी आतापर्यंत ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहेत, अशी माहितीदेखील शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

Intro:मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिका करोडो रुपये खर्च करते. मुंबई महापालिकेने २०१७ -१८ ते २०१८-१९ या दोन वर्षात ८ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारात शकील अहमद शेख यांना कळविले आहे. हा खर्च पाहता पालिकेने एक खड्डा बुजवायला तब्बल १७ हजार रुपये खर्च केला असल्याचे शकील अहमद यांनी म्हटले आहे.
Body:रस्ते बांधकामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. हे खड्डे बुजवण्यासाठीही कोट्य़वधी रुपये खर्च केला जातो.  २०१३ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या एकूण २४१४६ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या व त्यापैकी २३३८८ खड्डे भरल्याचा दावा केला आहे. तसेच २०१३ ते २०१९  या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण १७५ कोटी ५१ लाख ८६ हजार तरतूद निधींपैकी आतापर्यंत ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार हजार रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते  शकील अहमद शेख यांनी दिली. तर यंदा १० जून ते १ ऑगस्ट २०१९ पर्यंत २६४८ खड्ड्यांच्या तक्रारींपैकी २३३४ खड्ड्यांच्या टाकरींची दखल घेण्यात आली असून केवळ ४१४ तक्रारींची दखल घेण्याचे बाकी असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेने केलेला खर्च -
२०१३- १४ मध्ये २३०० खड्ड्यांवर ९७ लाख ९७ रुपये, २०१४ - १५ मध्ये २०९३ खड्ड्यांवर तरतूद केलेल्या ३९ कोटी २४ लाख २६ हजार रुपयांपैकी ३४ कोटी १६ लाख ९२ हजार रुपये, २०१५ - १६ मध्ये १५९३ खड्ड्यांवर १० कोटी ६१ लाख २७ हजार, २०१६ १७ मध्ये ६५४४ खड्ड्यांवर तरतुद करण्यात आलेल्या ३५ कोटी रुपयांपैकी १० कोटी ६१ लाख २७ हजार, २०१७ - १८ मध्ये ४०४५ खड्ड्यांवर तरतूद १० कोटी ५० लाख रुपयांपैकी ७ कोटी ७३ लाख २२ हजार, २०१८ - १९ मध्ये ४९१० खड्ड्यांवर तरतूद ११ कोटी ७० लाख रुपयांपैकी ७ कोटी ९८ लाख ७ हजार तर एप्रिल २०१९ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत २६६१ खड्डयांपैकी २४६२ खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केलेल्या ४० कोटी रुपयांपैकी अवघे १४ लाख ३५ हजार रुपये खर्च केला आहे.

बातमीसाठी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.