ETV Bharat / state

Selection For Award : मुंबई महापालिकेची महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पुरस्कारासाठी निवड

राज्यातील उल्लेखनीय काम केलेल्या राज्यातील महानगरपालिकांना (Municipal Corporations in the State) महाराष्ट्र महापौर परिषद (Maharashtra Mayor's Council) आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. यंदा ‘अ’ वर्ग महानगरपालिकेसाठी प्रथम क्रंमाक मुंबई महानगर पालिकेला (First rank to Mumbai Municipal Corporation) जाहीर झाला आहे.

author img

By

Published : Mar 26, 2022, 1:22 PM IST

Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिका

मुंबई: सन २०१८ - २०१९ या वर्षात केलेल्या कामांची माहिती राज्यातील २७ महापालिकांकडून मागवण्यात आली होती. प्राप्त माहितीच्या आधारे निवड समितीने महानगरपालिकांची पुरस्कारांसाठी निवड केली असून त्याबाबतचा निकाल महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी जाहीर केला. त्यात मुंबई महानगर पालिका अव्वल ठरली आहे. निवड समितीत मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष चव्हाण, निवृत सनदी अधिकारी व संस्थेचे विद्यमान महासंचालक डॉ. जयराज फाटक, निवृत सनदी अधिकारी राजीव अग्रवाल यांचा समावेश होता.

या गटातील उत्तेजनार्थ पुरस्कार हा नागपूर महानगरपालिकेला मिळाला आहे. ‘ब’ वर्ग महानगरपालिकेटा प्रथम क्रंमाक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला असून उत्तेजनार्थ पुरस्कार हा नाशिक महानगरपालिका देण्यात आला आहे. तर गट - ३ मधे ‘क’ व ‘ड’ वर्ग महानगरपालिकेतला प्रथम क्रंमाक हा नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला असून उत्तेजनार्थ पुरस्कार मिरा भाईंदर महानगरपालिका व भिवंडी निजामपुर महानगरपालिकेला मिळाल्याची माहिती रणजित चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा : Booster Dose Mumbai : केंद्र सरकारने निर्देश दिल्यास सर्व मुंबईकरांना 'बूस्टर डोस'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.