ETV Bharat / state

Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेने ट्रॅशबूमचा वापर करून काढला तरंगता कचरा

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नदी, नाल्यांमध्ये वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी आठ ठिकाणी ट्रॅशबूम (trashboom) लावला आहे. याद्वारे मागील तीन महिन्यांत तब्बल १० हजार ५०० क्यूबिक मीटर तरंगता कचरा (floating garbage in mumbai) अडवून संकलित करण्यात आला आहे.

तरंगता कचरा
तरंगता कचरा
author img

By

Published : Oct 23, 2022, 4:54 PM IST

मुंबई: मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नदी, नाल्यांमध्ये वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी आठ ठिकाणी ट्रॅशबूम (trashboom) लावला आहे. याद्वारे मागील तीन महिन्यांत तब्बल १० हजार ५०० क्यूबिक मीटर तरंगता कचरा (floating garbage in mumbai) अडवून संकलित करण्यात आला आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांमध्ये ट्रॅशबूमचा हा प्रयोग अतिशय मोलाचा ठरणार असून भविष्यात इतरही ठिकाणी ही उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

ट्रॅशबूमचा वापर: मुंबईतील जलप्रदूषण रोखून अधिकाधिक पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुंबईलगतचा समुद्र किनारा स्वच्छ राखणे, जल प्रदूषण होऊ नये, मुंबईतील खारफुटीचे क्षेत्र प्‍लास्टिक मुक्‍त राखणे, प्‍लास्टिक आणि इतर तत्सम कचरा समुद्रामध्ये थेट वाहून न जाता त्यापूर्वीच तो संकलित करणे, त्‍याची योग्यरित्या विल्‍हेवाट लावणे यासाठी महानगरपालिका प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. विदेशांमध्ये ट्रॅशबूम किंवा ट्रॅशनेट या तंत्राचा उपयोग करुन अशा उपाययोजना प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची अंमलबजावणी मुंबईतही करता यावी म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत एकूण आठ ठिकाणी ट्रॅशबूम व त्याला जोडून सरकते पट्टे असलेली यंत्रणा आता स्थापित केली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहांमधील तरंगता कचरा अडवणे आणि अडवलेला कचरा बाहेर काढणे ही दोन्ही कामे अतिशय वेगाने व सुलभपणे होवू लागली आहेत.

१० हजार ५०० क्‍युबिक मीटर कचरा: पश्चिम उपनगरातील जुहूतील गझधरबंध नाला तसेच मेन अव्‍हेन्‍यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोइसर नदी, दहिसर नदी, वाकोला नदी तर पूर्व उपनगरातील मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकूल जोडपूल) येथे ट्रॅशबूम प्रणालीची स्‍थापना करण्यात आली आहे. प्रारंभी त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर १५ जुलै २०२२ पासून आठही ठिकाणची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मिठी नदीवर माहीम निसर्ग उद्यानाला लागून असलेल्या जागी येत्या आठवडाभरात ही यंत्रणा सुरु होणार आहे. ट्रॅशबूम कार्यान्वित झालेल्या आठ ठिकाणांवरुन आतापर्यंत तीन महिन्यांत एकूण १० हजार ५०० क्‍युबिक मीटर एवढा कचरा अडवून संकलित करण्यात आला आहे. सरकत्या पट्टयांद्वारे सुलभपणे हा कचरा बाहेर काढण्यात आला. तसेच डंपरच्‍या ७५० फेऱयांद्वारे हा कचरा वाहून नेवून त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यात आली आहे.

असा झाला खर्च: ट्रॅशबूमसह सरकता पट्टा (conveyor belt) लावून तरंगता कचरा अडवणे, तो संकलित करुन बाहेर काढणे यासाठी आवश्यक यंत्रणेचा पुरवठा, स्‍थापना, चाचणी व कार्यान्वित करणे, संकलित कचऱ्याची विल्‍हेवाट लावणे, तसेच संपूर्ण यंत्रणेचे पुढील ३ वर्षांचे परिरक्षण करणे अशा एकत्रित कामासाठी निविदा मागविण्‍यात आल्‍या होत्या. त्यानुसार ४५ कोटी २० लाख रुपये किमतीचे कंत्राट देण्यात आले. यामध्ये ट्रॅशबूम प्रणालीच्‍या स्‍थापनेची किंमत एकूण १३ कोटी ४६ लाख रुपये आहे. तर पुढील ३ वर्षांकरीता या प्रणालीतून कचरा संकलित करणे, बाहेर काढणे, काढलेला कचरा वाहून नेणे, वाहून नेल्यानंतर त्‍याची योग्यरितीने विल्‍हेवाट लावणे, या संपूर्ण प्रचालन व परिरक्षण कामाचा एकूण खर्च ३१ कोटी ७३ लाख रुपये इतका आहे. सदर ट्रॅशबूम प्रणाली ही डेन्‍मार्कमधील त्याचे मूळ उत्‍पादक मेसर्स डेस्‍मी एन्‍व्‍हारो केअर यांच्याकडून आयात करण्‍यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.