ETV Bharat / state

जास्त व्याजासाठी मुंबई महापालिकेची खासगी बँकांकडे धाव

मुंबई महापालिकेने जास्त व्याज मिळण्याच्या लालसे पोटी करोडो रुपये खासगी बँकांमध्ये ठेवी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 79 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींवर पालिकेला 4500 कोटी रुपयांचे व्याज मिळते.

मुंबई महापालिका
author img

By

Published : Oct 15, 2019, 4:45 AM IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यावर खासगी आणि सहकारी बँकेवरील ग्राहकांचा विश्वास उडाला आहे. मात्र श्रीमंत अशा मुंबई महापालिकेने जास्त व्याज मिळण्याच्या लालसे पोटी करोडो रुपये खासगी बँकांमध्ये ठेवी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे संबोधले जाते. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अनेक छोट्या राज्यांपेक्षा मोठा आहे. महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 79 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींवर पालिकेला 4500 कोटी रुपयांचे व्याज मिळते. पालिकेच्या अर्थसंकल्पातील खर्च न झालेला निधी, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, कंत्राटदारांकडून घेण्यात आलेली सुरक्षा रक्कम, आदी रक्कम विविध बँकांमध्ये ठेवली जाते.

हेही वाचान - तपास अधिकारी बदला; कॉ. पानसरेंच्या कुटुंबीयांची न्यायालयात मागणी

खासगी आणि सहकारी बँक बुडीत म्हणून जाहीर होईल आणि मेहनतीच्या पैशासाठी पळापळ करावी लागेल, याकारणाने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. हे उदाहरण ताजे असताना महापालिका प्रशासनाने आय.सी.आय.सी.आय., एचडीएफसी, एक्सिस, येस बँक आदी बँकेत असलेल्या पालिकेच्या ठेवीमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करण्याचा तसेच महिंद्रा कोटक या खासगी बँकेत ठेवी ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे

Intro:मुंबई - पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यावर खासगी आणि सहकारी बँकेवरील ग्राहकांचा विश्वास उडाला आहे. मात्र श्रीमंत अशा मुंबई महापालिकेने जास्त व्याज मिळण्याच्या लालसे पोटी करोडो रुपये खासगी बँकांमध्ये ठेवी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Body:मुंबई महापालिकेला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बोलले जाते. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प छोट्या राज्यांपेक्षा मोठा आहे. महापालिकेचे विविध बँकांमध्ये 79 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींवर पालिकेला 4500 कोटी रुपयांचे व्याज मिळते. पालिकेच्या अर्थसंकल्पातील खर्च न झालेला निधी, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, कंत्राटदारांकडून घेण्यात आलेली सुरक्षा रक्कम, आदी रक्कम विविध बँकांमध्ये ठेवली जाते.

खासगी आणि सहकारी बँक कधी बुडीत म्हणून जाहीर होईल आणि आपल्या मेहनतीच्या पैशासाठी पळापळ करावी लागेल, याकारणाने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. हे उदाहरण ताजे असताना महापालिका प्रशासनाने आय.सी.आय.सी.आय., एचडीएफसी, एक्सिस, येस बँक आदी बँकेत असलेल्या पालिकेच्या ठेवीमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करण्याचा तसेच महिंद्रा कोटक या खासगी बँकेत ठेवी ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे

पालिकेचा फोटो video वापरावाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.